लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तामिळनाडूत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली महिला आणि पुरुष एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसने प्रवास करीत असल्याची गुप्त माहिती आरपीएफला मिळाली. नागपूर स्थानकावर आरपीएफच्या जवानांनी संबंधित महिला-पुरुषाची तपासणी केली. त्यांच्याजवळ काहीच आढळले नाही. अधिक चौकशी करण्यापूर्वीच या दोघांनी आपल्याजवळील लाडूसारखा पदार्थ खाल्ला आणि प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा धावत्या गाडीतच मृत्यू झाला. या घटनेमुळे दोघांनीही आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना तामिळनाडू येथे आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली एक महिला आणि पुरुष लाखो रुपये आणि सोने घेऊन एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसने प्रवास करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफचे जवान नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी आल्यानंतर गाडीत चढले. थोड्या वेळानंतर त्यांना हवा असलेला पुरुष आणि महिला आढळली. परंतु त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ पैसे किंवा सोने काहीच आढळले नाही. नरखेड येण्यापूर्वी या दोघांनीही आपल्याजवळील लाडूसारख्या पदार्थाचे सेवन केले. थोड्याच वेळात ते दोघेही बेशुद्ध झाले. त्यांना नरखेड स्थानकावर तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. दोघांनीही एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये बर्थचे आरक्षण केले होते. दोघांचाही मृत्यू त्यांनी सेवन केलेल्या पदार्थामुळे झाला की त्यांचा घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, मंगळवारी तामिळनाडू पोलीस या घटनेच्या तपासासाठी नागपुरात येत असल्याची माहिती ‘आरपीएफ’चे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी दिली.
धावत्या रेल्वेगाडीत पुरुष, महिलेची आत्महत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:45 PM
तामिळनाडूत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली महिला आणि पुरुष एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसने प्रवास करीत असल्याची गुप्त माहिती आरपीएफला मिळाली. नागपूर स्थानकावर आरपीएफच्या जवानांनी संबंधित महिला-पुरुषाची तपासणी केली. त्यांच्याजवळ काहीच आढळले नाही. अधिक चौकशी करण्यापूर्वीच या दोघांनी आपल्याजवळील लाडूसारखा पदार्थ खाल्ला आणि प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा धावत्या गाडीतच मृत्यू झाला. या घटनेमुळे दोघांनीही आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठळक मुद्देनरखेड सेक्शनमधील घटना : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात होते फरार