मरकाम पूर्वी नागपुरात कामाला असताना लकडगंजच्या जयभीम चौकात राहणारे अश्विन ढोके यांच्या घरी भाड्याने राहत होता. शुक्रवारी रात्री मरकाम ढोके यांच्या घरी आला आणि वरच्या माळ्यावर जाऊन त्याने गळफास लावून घेतला. शुक्रवारी रात्री ८.३० ला ही घटना उघडकीस आली. अक्षयकुमार रमेश मेश्राम (२२) यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
तरुणाचा आकस्मिक मृत्यू
नागपूर : गोधनी मार्गावरील शिवा रेसिडेन्सीमध्ये राहणारा गाैरव राजीव तिवसकर (वय २४) यांची शुक्रवारी रात्री अचानक प्रकृती खालावली आणि रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उज्ज्वल धैर्यशील शिकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
विष प्राशन करून आत्महत्या
नागपूर : सक्करदऱ्यातील भांडेल्पॉट परिसरात राहणारे नरेश वामनराव इंगोले (वय ५२) यांनी विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या सूचनेवरून सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. इंगोले यांच्या आत्महत्येमागच्या कारणाची पोलीस चाैकशी करीत आहेत.
----