शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

विषारी साप चावल्यानंतरही 'तो' नाकारातच होता; डॉक्टरांचे प्रसंगावधान, पती-पत्नीचे वाचले प्राण

By सुमेध वाघमार | Published: June 08, 2023 6:38 PM

डॉक्टरांनी वेळ न घालविता आपल्या अनुभवाच्या बळावर त्या दृष्टीने उपचाराला सुरूवात केली. पुढील ३२ तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले.

नागपूर : पत्नीला साप चावल्याने पतीने तिला मेडिकलमध्ये दाखल केले. उपचाराला सुरूवात झाली. काही वेळेनंतर पतीलाही अस्वस्थ वाटू लागले. सापाने दंश केले का, असे डॉक्टरांनी विचारले. परंतु पतीने नाकारले. व्हेंटिलेटर लावण्यापर्यंत पतीची प्रकृती गंभीर झाली, तरी साप चावल्याचे तो नाकारत होता. मात्र, त्याची लक्षणे पाहून डॉक्टरांना खात्री पटली. त्या दिशेन उपचाराला सुरुवात केली. ३२ तासांच्या शर्थीच्या उपचारानंतर पतीसोबतच पत्नीचेही प्राण वाचविले.

कामठी रोडवरील खसाडा नाकाजवळील विट भट्टीत ४० वर्षीय पत्नी रुखमिनीबाई आणि ४५ वर्षीय पती पुरण मजूर म्हणून कामाला आहेत. ४ जून रोजी दिवसभर काम करून ते आपल्या झोपडीत झोपले होते. पहाटे २.३० वाजताच्या सुमारास पत्नी किंचाळून जागी झाली. पतीही दचकून उठला. त्यांच्या पलंगावर साप होता. पत्नीला साप चावल्याचे पाहता पतीने लागलीच मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये दाखल केले.

डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केली. एकाच पलंगावर दोघेही झोपले असल्याने, डॉक्टरांनी सहज म्हणून तुम्हाला साप चावला नाही का, असे पतीला विचारले. परंतु त्याने नाकारले. पहाटे ५ वाजताच्या सुमारास पतीला छातीत दुखत असल्याची तक्रार सुरू झाली. डॉक्टरांनी त्याला तपासून ईसीजी काढून घेतला. त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. डॉक्टरांनी पुन्हा त्याला साप चावला का, कुठे सूज आली का, असा प्रश्न केला. परंतु त्याची नकार घंटा सुरूच होती. तरीही डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले.

सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याला श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली तरी तो नाकारतच होत. त्याची सर्पदंशाची लक्षणे सूचक होती. डॉक्टरांनी वेळ न घालविता आपल्या अनुभवाच्या बळावर त्या दृष्टीने उपचाराला सुरूवात केली. पुढील ३२ तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले. तो धोक्याबाहेर आला. व्हेंटिलटर काढून त्याला सामान्य वॉर्डात दाखल केले. सध्या पती-पत्नी दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या रुग्णांवर मेडिकलच्या मेडिसीन विभागाचे डॉ. मिलिंद व्यवहारे व डॉ प्रवीण शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. आशिष, डॉ. रामकिशन, डॉ. अस्मिता, डॉ. श्रुतिका, डॉ. भाग्यश्री, डॉ. रुषिकेश, डॉ. पंकज आणि डॉ. हरीश यांनी विशेष परिश्रम घेऊन दोघांचेही जीव वाचविले. धक्कादायक म्हणजे, पती मृत्यूचा दारातून बाहेर आला तरी तो साप चावल्याचा घटनेला नाकारतच आहे

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलnagpurनागपूरdoctorडॉक्टरsnakeसाप