लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी नृत्य व लोकसंगीताला स्पर्श करणारा, आगळावेगळा, रसिकांसाठी रंजक ठरणारा, पोटभरून हसविणारा, मराठी बाणा जागविणारा दिलखुलास कार्यक्रम नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला नागपूरकर रसिकांना चिंब करून गेला. अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर अशोक हांडे व त्यांच्या चमूने सादर केलेला लोकसंस्कृतीचा चौरंग भलताच खुमासदार ठरला.मराठी वाद्यवृंदाच्या इतिहासात एक वेगळा प्रयोग म्हणून रसिकमान्यता आणि लोकप्रियता मिळालेल्या मंगलगाणी दंगलगाणी या कार्यक्रमाचा नागपुरात सादर झालेला हा २०१३ वा प्रयोग होता. या प्रयोगाच्या माध्यमातून नाट्य संमेलनाच्या माहौलमध्ये आणखीच रंगत भरली. प्रयोगाच्या पूर्वी अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार प्रफुल्ल फरसाके, नरेश गडेकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले आणि प्रयोगाचा पडदा उठताच गायिकेच्या सुरावटीने ‘मोगरा फुलला’.संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानापासून ते पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या कसाईदानापर्यंतचा मराठी गाणी, संगीत व संस्कृतीचा संगीतमय इतिहास या कार्यक्रमात सादर करण्यात आला. अभंग, शाहिरी, काव्य, पोवाडे, लावणी, गवळण, नाट्यसंगीत, भावसंगीत, सुगमसंगीत, चित्रपट गीते असा महाराष्ट्राचा सांगितिक ठेवा या कार्यक्रमातून उलगडला गेला. नृत्य, नाट्य, चित्रफीत, गाणी आणि संगीत या सगळ्याचा एकत्र मिलाप या कार्यक्रमातून दिसून आला.कविवर्य सुरेश भट सभागृहात सादर झालेल्या या कार्यक्रमाला बघण्यासाठी नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती.
मराठी संस्कृतीला स्पर्श करणारी ‘मंगलगाणी दंगलगाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:04 AM
मराठी नृत्य व लोकसंगीताला स्पर्श करणारा, आगळावेगळा, रसिकांसाठी रंजक ठरणारा, पोटभरून हसविणारा, मराठी बाणा जागविणारा दिलखुलास कार्यक्रम नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला नागपूरकर रसिकांना चिंब करून गेला. अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर अशोक हांडे व त्यांच्या चमूने सादर केलेला लोकसंस्कृतीचा चौरंग भलताच खुमासदार ठरला.
ठळक मुद्देनाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला रंगारंग कार्यक्रम : मराठी संगीताचा आगळावेगळा नजराणा