लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आंबे पिकविण्यासाठी इथेफॉन (इथेलिन रायपर) या रासायनिक पावडरचा (पाऊच) उपयोग करून नैसर्गिक आंबे पिकविण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात ‘एफएसएसएआय’ने गेल्या वर्षी आंब्याच्या सीझननंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी अधिसूचना काढली आहे. नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवा अन्यथा कारवाईस तयार राहा, अशा इशारा अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.संशोधनानंतरच अधिसूचनासंपूर्ण देशात आंबे पिकविण्यासाठी व्यापारी कॅलशियम कार्बाईडचा उपयोग अजूनही करीत आहेत. प्रतिबंध असलेल्या या रसायनाने पिकविलेला आंबा कॅन्सर या गंभीर आजाराला आमंत्रण देणार आहे. हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आंबे पिकविण्यासाठी अर्थात विक्रीयोग्य करण्यासाठी या रासायनिक पावडरचा उपयोग करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अधिकारी कठोर कारवाई करीत होते. त्यामुळे त्रस्त व्यापाऱ्यांनी इथेफॉन पावडरचा वापर करणे सुरू केले. पण गेल्या वर्षीच्या हंगामात अधिकाऱ्यांनी या पावडरचा उपयोगकरणाऱ्यांवरही कारवाई केली. कळमना बाजारातील व्यापाऱ्यांकडून अनेक नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. सीझन संपल्यानंतर ‘एफएसएसएआय’ने इथेफॉन पावडरच्या वापराला परवानगी देणारी अधिसूचना काढली. त्यामुळे यावर्षीपासून सर्व व्यापारी इथेफॉन पावडरच्या पुड्यांचा उपयोग करीत आहेत. या रसायनाने पिकलेला आंबा शरीरासाठी पोषक असल्याचे ‘एफएसएसएआय’चे मत आहे.इथेलिन गॅसमुळे पिकतात आंबेइथेफॉन पावडरचे पाऊच चीन आणि दक्षिण कोरियामधून भारतात मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येते. ते किमतीत स्वस्त आहे. काही पाऊच आंब्याच्या बॉक्समध्ये टाकल्यास त्यापासून इथेलिन गॅस तयार होऊन आंबे लवकर पिकतात आणि विक्रीसाठी तयार होतात. तसे पाहता आंब्याच्या पेटीत ठेवलेल्या तणसापासूनही इथेलिन गॅस तयार होऊन आंबे पिकतात. पण या प्रक्रियेला जास्त कालावधी लागतो. याउलट इथेफॉन पावडरमुळे आंबे लवकर पिकतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा होतो.फळे व पावडरचा थेट संपर्क नको‘एफएसएसएआय’ने काढलेल्या अधिसूचनेत इथेफॉन पावडर आणि फळांमध्ये थेट संपर्क नको, असे नमूद केले आहे. संपर्क आल्यास गंभीर आजाराचा धोका उद्भवणार आहे. आंब्याच्या बॉक्समध्ये या रसायनाचे पाऊच टाकायचे आहेत. सुरक्षा मानके कायदा-२००६ मधील तरतुदीनुसार कॅलशियम कार्बाईड रसायनाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या रसायनाचा वापर केल्यास कायद्यातील कलम ५९ नुसार संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र ठरणार आहे.कळमन्यात चार व्यापाऱ्यांकडे गॅस चेंबरआंबे इथेफॉन गॅसच्या चेंबरमध्येही पिकविता येतात. कळमना बाजारात चार व्यापाऱ्यांकडे असे चेंबर आहेत. त्यात पिकविलेले आंबे विक्रीसाठी लवकरच तयार होतात. चेंबर तयार करण्यासाठी मोठी जागा आणि खर्च येतो. त्यामुळे लहान व्यापारी चेंबर तयार करीत नाही. केवळ बॉक्समध्ये रसायनाचे पाऊच टाकून आंबे पिकविणाऱ्यांवर त्यांचा भर असतो. यामुळे इथेफॉन गॅसमुळे पिकलेले आंबे ग्राहकांना भीती न बाळगता खाता येणार आहे.विभागाचा निरंतर कारवाईवर भरआंबे पिकविण्यासाठी इथेफॉन पावडरचा (पाऊच) उपयोग करण्यासाठी ‘एफएसएसएआय’ने गेल्या वर्षी अधिसूचना काढली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना या रसायनाने आंबा पिकण्यास आता मनाई नाही. पण कॅल्शियम कार्बाइडने आंबा पिकविताना त्यापासून तयार होणारा अॅसेटिलिन गॅस शरीरासाठी घातक आहे. या रसायनाचा उपयोग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. विभागाचा निरंतर कारवाईवर भर आहे.मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)अन्न व औषधे प्रशासन विभाग.
नैसर्गिक प्रक्रियेने आंबा पिकवा, अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 8:38 PM
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आंबे पिकविण्यासाठी इथेफॉन (इथेलिन रायपर) या रासायनिक पावडरचा (पाऊच) उपयोग करून नैसर्गिक आंबे पिकविण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात ‘एफएसएसएआय’ने गेल्या वर्षी आंब्याच्या सीझननंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी अधिसूचना काढली आहे. नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवा अन्यथा कारवाईस तयार राहा, अशा इशारा अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
ठळक मुद्दे‘एफएसएसएआय’ची इथेफॉन पावडरला परवानगी : कॅलशियम कार्बाईडवर प्रतिबंध