शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

नागपुरातील तहसीलदाराच्या कक्षात शिरस्तेदाराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 7:48 PM

प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची भावना झाल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने तहसीलदाराच्या कक्षात नझूलच्या शिरस्तेदाराला मारहाण केली. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता घडलेल्या या घटनेने प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती.

ठळक मुद्देप्रशासनात खळबळ : सदरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची भावना झाल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने तहसीलदाराच्या कक्षात नझूलच्या शिरस्तेदाराला मारहाण केली. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता घडलेल्या या घटनेने प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती.शेख इकबाल शेख अहमद (रा. लेंडी तलाव, बंगाली पंजा) याच्या घराच्या जागेचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून नझूल तहसीलदाराकडे प्रलंबित होता. त्यासंबंधाने आरोपी इकबाल वारंवार संबंधितांच्या भेटीगाठी घेत होता. त्याचा अर्ज निकाली निघत नसल्याने तो संतप्त झाला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी या अर्जाची सुनावणी येथील सिव्हिल लाईनमधील नझूल तहसीलदाराच्या कार्यालयात ठेवण्यात आली होती. सायंकाळी ५.३० वाजता या अर्जाची सुनावणी सुरू असताना आरोपी शेख इकबाल संतप्त झाला. त्याने अचानक आक्रमक होत नझूल शिरस्तेदार प्रवीण विजय प्रयागी (वय ४१, रा. म्हाडा कॉलनी, हिंगणा रोड) यांच्या अंगावर धाव घेतली. त्यांना मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.चक्क तहसीलदाराच्या कक्षात हा प्रकार घडल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली. आरोपीला बाकीच्यांनी कसे बसे आवरले. प्रयागी यांनी सदर ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. एएसआय अजय गरजे यांनी आरोपी शेख इकबालविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाGovernmentसरकार