लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी रविभवन येथे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने आणि बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे.महाराष्ट्रातील आंबेडकरी, मुस्लिम, ओबीसीसह इतर पक्षांना जोडण्याचा प्रयत्न काँग्रेस-भाजप करीत आहेत. त्यातच बहुजन वंचित आघाडी स्थापन झाल्याने मोठ्या पक्षांना घाम फुटला. शनिवारी अॅड. सुरेश माने यांच्या बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या (बीआरएसपी)च्या दोन दिवसीय अधिवेशनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी ठाकरे व माने यांच्यात रविभवन येथे राजकीय चर्चा झाल्यात़ या भेटी अगोदर त्यांनी रविभवनामध्ये अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या, माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अॅड. सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी या दोन आंबेडकरवादी नेत्यांच्या भेटी ठाकरे यांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
माणिकराव ठाकरेंनी घेतली नागपूरच्या रविभवनात माने-कुंभारेंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:51 PM
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी रविभवन येथे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने आणि बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे.
ठळक मुद्देराजकीय वर्तुळात चर्चेला उधाण