शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मनमुराद दाद घेत ठसला ‘मराठी बाणा’

By admin | Published: March 03, 2016 2:59 AM

गण-गवळण, महालक्ष्मीचा गोंधळ, जेजुरीचा खंडेराया अशा विषयांची मांडणी करीत अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे साक्ष पटवून देत ...

अशोक हांडे यांच्या चौरंगचे सादरीकरण : नागपूर महोत्सवाचा थाटात समारोप नागपूर : गण-गवळण, महालक्ष्मीचा गोंधळ, जेजुरीचा खंडेराया अशा विषयांची मांडणी करीत अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे साक्ष पटवून देत जत्रा, झिम्मा, फुगड्या, लेझीम, तमाशा, लावणी, भारुड आदींचे दमदार सादरीकरण करीत चौरंगच्या कलावंतांनी नागपूरकरांची दाद घेतली. शिट्ट्या, टाळ्या आणि वन्समोअरची दाद देत नागपूरकरांच्या मनात आज मराठी बाणा ठसला. तब्बल १७५० प्रयोगानंतरचा हा एक यशस्वी प्रयोग नागपुरात रसिकांना नास्टॅल्जिक करणारा होता. नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्यावतीने यशवंत स्टेडियम, धंतोली येथे आयोजित नागपूर महोत्सवाचा आज थाटात समारोप करण्यात आला. या महोत्सवाचे संयोजन लोकमत समुहाने केले होते. काही वर्षांपूर्वी मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया असे हिट कार्यक्रम घेऊन रसिकांमोर आलेल्या अशोक हांडे यांनी खास जगभरातील मराठी रसिकांसाठी मराठी संस्कृतीचा जागर करणारा मराठी बाणा या कार्यक्रमाची निर्मिती केली आणि पाहता पाहता आतापर्यंत या कार्यक्रमाने १७५० प्रयोगांपेक्षाही जास्त कार्यक्रमांचा टप्पा गाठला. प्रत्येक गीताचे, नृत्याचे परफेक्शन आणि रसिकांच्या मनाला भिडणारे सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम रंगतदार झाला. या कार्यक्रमातून जागतिकीकरणाच्या विळख्यात लोप पावत असलेल्या पण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असलेल्या संस्कृतीचा आणि आपल्या मराठमोळ्या जगण्याचा जागरच झाला. आपले मराठीपण हल्ली लोप पावते आहे. अशा वेळी आपल्या मराठी जगण्याचे अनेक पदर, पैलू आणि त्याच्या आठवणी प्रेक्षकांसमोर आणण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला. आधुनिकीकरणात कुंकू लावणे, मंगळागौर साजरी करणे आदी परंपराही कमी झाल्या आहेत; पण राज्याच्या ग्रामीण भागात मात्र या परंपरा आजही जपल्या जातात. या परंपरांचे अर्थ गीतातून आणि नृत्यातून सांगण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचा प्रारंभ भूपाळीने करण्यात आला. भारदस्त आवाजाचे धनी असलेल्या अशोक हांडे यांचा फेटा घालून रंगमंचावर झालेला प्रवेश आणि भूपाळीचे गायन रसिकांना सुखावणारे होते. महाराष्ट्राच्या दिवसाची सुरुवात प्रातिनिधिकपणे या भूपाळीतून सादर करण्यात आली. साधारणत: ग्रामीण भागाचे हे चित्रण रसिकांना आनंद देणारे होते. यानंतर वासुदेवाची स्वारी, तो हा विठ्ठल बरवा हे भजन कलावंतांनी सादर केले. गीत सादर करण्यात येत असताना त्या गीतावर नृत्यही सादर करण्यात येत असल्याने रसिकांना जिवंत अनुभव मिळत होता. प्रत्येक भाषा आणि त्या भाषेची संस्कृती असते. त्या संस्कृतीची काही वैशिष्ट्ये असतात तशीच मराठी संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगणारे नृत्य आणि गीत कार्यक्रमात सादर करण्यात आले. यावेळी ‘असं एखादं पाखरु वेल्हाळ..., आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं..., लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला.., माळ्याच्या मळ्यामंधी पाटाचं पाणी जाते.., गोमू माहेरी जाते हो नाखवा..., बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल..., प्रथम तुज पाहता...’ आदी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात प्रेक्षक अखेरपर्यंत रंगले होते. कार्यक्रम संपू नये असे वाटत असताना अखेर कार्यक्रम संपला.(प्रतिनिधी) नेत्रदान, देहदानाच्या आवाहनासह सामाजिक प्रबोधनअशोक हांडे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन केले. मरणोत्तर नेत्रदान करून दृष्टी नसलेल्या व्यक्तीला हे सुंदर जग पाहण्याची संधी द्या, देहदान करून उद्याचे डॉक्टर घडविण्यात आपला वाटा द्या, असे आवाहन त्यांनी केले. लोकशिक्षणावर भर देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना फेटेमहोत्सवाच्या समारोपाला महापालिकेतील, पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह बहुतांश नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. महापालिकेतर्फे सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना फेटे बांधण्यात आले. ही फेटेधारी मंडळी उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधून घेत होती. फेटेधारी नगरसेवकांनी एकत्र येत फोटोही काढून घेतला. महोत्सवात एकच गर्दी‘मराठी बाणा’ कार्यक्रम पाहण्यासाठी नागपूरकरांनी एकच गर्दी केली होती. यशवंत स्टेडियमध्ये लावलेले सोफे, खुर्च्या खचाखच भरल्या होत्या. कार्यक्रमात पाच मिनिटांसाठी मध्यांतर झाले. मात्र, या मध्यंतरातही प्रेक्षकांनी खुर्च्या सोडल्या नाहीत. कार्यक्रमाचे शेवटचे सादरीकरण होईपर्यंत नागपूरकर खिळून बसले होते. ‘वेलडन एनएमसी’ नागपूरकरांची थापमहोत्सवाचा समारोप झाला. गेली चार दिवस महोत्सवाला उत्साहाने हजेरी लावणारे नागपूरकर आनंदी मनाने घरी परतले. जाताना प्रत्येकाच्या तोडून ‘वेलडन एनएमसी’ अशी कौतुकाची थाप महापालिकेला मिळत होती. महोत्सव झक्कास झाला. मज्जा आली. पुढील वर्षी याहूनही अधिक मजा येणार. महापालिकेला नागपूर महोत्सव कधीच बंद करू नये, अशा प्रतिक्रिया नागपूरकर व्यक्त करीत होते.महोत्सवाला उपस्थित मान्यवरपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर अटल बहादूर सिंग, कांचनताई गडकरी, सिने कलावंत डॉ. विलास उजवणे, महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आयुक्त श्रावण हर्डीकर, बृहन्मुंबईचे उपायुक्त राम धस, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, नगरसेवक बाल्या बोरकर, बंडू राऊत, गोपाळ बोहरे, मनोज साबळे, रवी डोळस, विशाखा मैंद, नीलिमा बावणे, शीला मोहोड, साधना बरडे, संगीता गिऱ्हे, रश्मी फडणवीस, अपर आयुक्त नयना गुंडे, उपायुक्त आर.झेड. सिद्धिकी, संजय काकडे, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, जयंत दांडेगावकर, रंजना लाडे, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, राजेश कराडे, गणेश राठोड, राजू भिवगडे, सुभाषचंद्र जयदेव, महेश मोरोणे, हरीश राऊत, दिलीप पाटील, प्रकाश वराडे, महेश धामेचा, निगम सचिव हरीश दुबे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, मदन गाडगे, सतीश अग्रवाल, शशिकांत हस्तक, संजय गायकवाड, दिलीप जामगडे, एएम.जी. कुकरेजा, राहुल वारके, एम. एच. तालेवार, एस.पी. जयस्वाल आदी अधिकारी उपस्थित होते.