लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात प्रत्येक शनिवार व रविवारी कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. परंतु विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मात्र असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात गठित समितीची नियमित बैठक होत असते. दोन दिवसानंतर समितीची बैठक होणार असून यासंदर्भात मंथन केले जाईल, आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने जे काही शक्य असेल ते केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊनबाबत शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ सामील आहेत. लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचा अधिकार या समितीला देण्यात आला आहे.सध्या सोशल मीडियावर ही चर्चा जोरात आहे की, दर शनिवार व रविवारी कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू होऊ शकतो. विभागीय आयुक्तांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले की, याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. सध्या अनलॉक सुरूआहे. उद्योग-व्यापार आदी सुरु झालेले आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी प्रत्येक बाबींवर विचार करणे आवश्यक राहील.समितीच घेणार निर्णय - पालकमंत्रीपालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट सांगितले की, लॉकडाऊ नबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. यावर निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीतच यावर निर्णय होईल. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
नागपुरात लॉकडाऊनवर सोमवारी मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 12:44 AM
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात प्रत्येक शनिवार व रविवारी कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. परंतु विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मात्र असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात गठित समितीची नियमित बैठक होत असते. दोन दिवसानंतर समितीची बैठक होणार असून यासंदर्भात मंथन केले जाईल, आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने जे काही शक्य असेल ते केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्देप्रत्येक बाबींवर होणार चर्चा