शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

नागपूरच्या अनेक भिंती 'लालच लाल', आश्चर्यचकीत करणारं कारण! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 5:22 PM

जिकडे नजर टाकाल तिथे केवळ 'लाल भिंती'

सुरभी शिरपूरकर

नागपूर : ही आहे नागपूरची शासकीय इमारत..  इमारतीच्या चारही बाजूला केवळ थुकण्याचे डाग दिसतात.  कितीही भव्य कितीही आलिशान या इमारती असल्या तरीसुद्धा या  इमारतींच्या भिंतीवर खर्रा किंवा पान खाऊन लोकांनी घाण पसरविली आहे. अक्षरशः जागोजागी थुकून भिंतींचा रंग बदलला आहे. या केवळ शासकीय इमारतच नाही तर नागपूरचा एक-एक कोपरा.. प्रत्येक रस्ते प्रत्येक बॅरिगेट्स मेट्रो स्टेशन्स रेल्वे स्टेशन मेट्रो ब्रिज.. उड्डाण पुलाच्या भिंती.. मंदिराच्या भिंती अशा अनगिनत नागपूरच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असंच काहीस चित्र पाहायला मिळेल.

नागपूर किंवा विदर्भात खर्रा अतिशय प्रसिद्ध असा तंबाखूचा प्रकार आहे. तसं तर राज्यात गुटखाबंदी आधीपासूनच सुरू आहे तरीसुद्धा शहरात पान ठेल्यावर खुलेआम खर्रा मिळतो. याशिवाय या खऱ्यामध्ये विविध मिश्रण करूनही त्याला चव आणण्यात येते, त्यामुळे या खऱ्याला विदर्भात अधिक पसंती आहे. नागपुरी खर्रा समंध राज्यात प्रसिद्ध आहे. हा खर्रा कर्करोगासह इतरही आजार घेऊन येतो. याबाबत माहिती असूनही शौकिनांची संख्या मात्र वाढत जात आहे. याशिवाय पान खाणारे अनेक हौशी आहेत. गुटखा थेट अनेकदा मिळत नसल्याने विविध मिश्रण करून गुटखा तयार करणारे ही आहेतच. त्यामुळे असले सगळे पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर कार्यालय परिसरात थुंकणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 

एवढंच काय तर लोकं हॉस्पिटलच्या स्टेअर केसवर सुद्धा थुंकतात. स्टेर केशच्या कोपऱ्यात अनेकदा देवाचे चित्र लावलेले दिसतात जेणेकरून देवाचे चित्र बघून तरी  किमान या जागेवर थुंकणार नाही, असा उद्देश या मागचा असतो. ही शक्कल लढवूनसुद्धा लोकांना मात्र ती समज येत नाही. स्वतःबरोबर दुसऱ्यांचे आयुष्य ही असले लोक धोक्यात टाकतात.

अशा थुंकण्यातून सामान्य जनतेसाठी सुद्धा धोक्याची घंटी आहे कारण या थुंकण्यातून आजाराला थेट आमंत्रण आहे. एवढेच काय तर देशात प्रसिद्ध असलेला नागपुरी खर्रा हा सर्वाधिक कॅन्सरला पोषक ठरणारा अतिशय घातक पदार्थ आहे. यात सुपारीचे तुकडे, वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा, तंबाखू, चुना मिसळून खूप ‘घोटला’ जातो. खर्रा जितका घोटला जाईल तेवढा रंगत आणतो, असे म्हणतात. आणि मग हाच रंग आपल्याला नागपूरच्या बिंतींवर पाहायला मिळतो. मात्र स्वतःच शहर आणि स्वतःच शरीर नागपूरकरांसाठी महत्त्वाचा नाही का असाच महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न या चित्रांना बघून समोर येतोय.

टॅग्स :SocialसामाजिकTobacco Banतंबाखू बंदीnagpurनागपूर