शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

उपराजधानीत अनेक अवैध पिस्तुलधारी

By admin | Published: June 12, 2016 2:31 AM

बनावट परवान्याच्या आधारे उपराजधानीत अनेक जण राजरोसपणे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

बनावट परवान्याचा वापर : पोलीस यंत्रणा खडबडून जागी झालीनरेश डोंगरे नागपूरबनावट परवान्याच्या आधारे उपराजधानीत अनेक जण राजरोसपणे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. महिनाभरात दोन प्रकरणे उघड झाल्याने पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात अधिकृत किती आणि अनधिकृत (बनावट परवानाधारक) किती पिस्तुलधारी आहेत, त्याची माहिती गोळा केली जात आहे. स्वत:च्या जानमालाचे रक्षण करण्याचा घटनादत्त अधिकार प्रत्येकाला आहे. आपल्या जीविताला धोका असल्याची जाणीव झालेला व्यक्ती प्रसंगी स्वरक्षणासाठी पिस्तूल किंवा माऊझर (अग्निशस्त्र) जवळ बाळगू शकतो. कायद्यानुसार त्याला पोलीस अग्निशस्त्र बाळगण्याचा परवानाही देतात. मात्र, त्यासाठी पोलिसांच्या काही अटी-शर्ती आहेत. परवाना मिळविण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला आपल्या किंवा परिवारातील व्यक्तीच्या जीवाला कसा धोका आहे, ते पोलिसांना सोदाहरण पटवून द्यावे लागते. याशिवाय पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करतानाच चारित्र्य प्रमाणपत्रासह अनेक प्रमाणपत्रेही पोलीस आयुक्तालयात सादर करावी लागतात. अग्निशस्त्राच्या परवान्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसावा आणि तो गुन्हेगारीवृत्तीचा नसावा, ही एक मुख्य अट असते. शिवाय तो अग्निशस्त्राचे सार्वजनिक प्रदर्शन अथवा कुणाला भीती दाखविण्यासाठी वापर करणार नाही, अशीही दुसरी एक मुख्य अट असते. गुन्हे दाखल असलेल्याला किंवा गुन्हेगाराला अग्निशस्त्राचा परवाना मिळत नाही. स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला, व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता यांना पोलिसांकडून अग्निशस्त्राचा परवाना मिळतो. हा परवाना मिळाल्यानंतर पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तीनुसार संबंधित परवानाधारक अधिकृतपणे अग्निशस्त्र आणि काडतूस विकत घेऊन जवळ बाळगू शकतो.तीन हजाराहून अधिक परवाने नागपूर : स्वत:चा जीव वाचविण्यासाठी त्याचा वापरही करू शकतो. निवडणूका आणि आणीबाणीच्या वेळी अग्निशस्त्र आणि काडतूस पोलिसांकडे जमा करावे लागतात. ठराविक मुदतीनंतर पोलीस संबंधित व्यक्तीला त्याचे अग्निशस्त्र परत करतात. अशाप्रकारे शहरात तीन हजारांपेक्षा जास्त व्यक्तींकडे अग्निशस्त्रांचे परवाने आहेत. अर्थात शहरातील अनेक जण पिस्तूल, रिव्हॉल्व्हरधारक आहेत. त्यातील अनेकांनी अटीशर्तींचे पालन करून परवाना मिळवला असला तरी काही जणांनी मात्र पाच वर्षांपूर्वीपर्यंत लागेबांधे वापरून अग्निशस्त्राचा परवाना मिळवला आहे. शहरात गाजलेल्या लखोटिया बंधू हत्याकांड आणि त्यानंतर व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे पोलिसांनी अग्निशस्त्र परवाना देण्याचा सपाटा लावल्याचे पाहून लागेबांधेवाल्यांनी पोलिसांकडे अग्निशस्त्र परवाना मिळवण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे चुकून नको त्या व्यक्तींकडे परवाने गेल्याचे लक्षात आल्याने तत्कालीन सहपोलीस आयुक्त (सध्याचे मुंबई गुन्हेशाखेचे सहपोलीस आयुक्त) संजय सक्सेना यांनी परवाना वाटपाला ब्रेक लावला. त्यानंतर परवाना मागणाऱ्यांची संख्या आपोआपच रोडावली. त्यामुळे सद्यस्थितीत शहरात अधिकृत परवानाप्राप्त अग्निशस्त्रधारकच आहे, असा आतापर्यंत खुद्द पोलिसांचाही समज होता. महिनाभरापूर्वी डब्बा प्रकरणातील आरोपी नीरज अग्रवालकडे पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी कागदपत्रांसह पोलिसांना अग्निशस्त्राचा परवानाही सापडला. तो नागालॅण्डचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २६ मे रोजी कामठी नगर परिषदेचे उपाध्यक्ष रंजित सफेलकर यांच्या कारमध्ये पिस्तुल सापडले. त्यांचा परवाना गोरखपूर (उत्तरप्रदेश)चा होता. ज्या ठिकाणी व्यक्तीचे वास्तव्य आहे, त्या जिल्ह्याचे प्रशासनच अग्निशस्त्राचा परवाना देते. त्यामुळे या दोन अग्निशस्त्र परवान्यांनी अनेक शंकाकुशंका निर्माण केल्या असून, पोलिसांची झोप उडवली आहे. (प्रतिनिधी)