लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीर्घ कालावधीनंतर आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्ष व विरोधकांत विविध मुद्यांवरून संघर्षाचे वातावरण असतानाच सभागृहाबाहेरही विविध प्रश्नांवरून राजकीय पक्षाच्या नेतृत्वात मोर्चे काढण्यात आले. नागनदी सौंदर्यीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जय जवान जय किसान संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. तर पारडी भागातील तलमले यांच्या १८ एकर जमिनीवरील आरक्षण हटवून भूमाफियांना विकण्याच्या विरोधात मोर्चा काढून प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. बंटी शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. आम आदमी पार्टीतर्फे महापौरांच्या विरोधात निदर्शने क रण्यात आली.पुनर्वसनाशिवाय नागनदी प्रकल्प राबवानागनदी सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी नदीकाठाच्या दोन्ही बाजूकडील १५ मीटर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. प्रकल्पामुळे हजारो नागरिक बाधित होणार असल्याने पुनर्वसनाशिवाय प्रकल्प पूर्ण होईल, असा अभ्यासपूर्ण प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर, महापालिकेतील पक्षाचे गटनेते दुनेश्वर पेठे व जय जवान जय किसानचे नेते प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हजारो झोपडपट्टीधारकांनी महापालिकेच्या महाल येथील टाऊ न हॉलवर मोर्चा काढण्यात आला. नागनदी सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी दोन्ही बाजूची १५ मीटर जागा अधिग्रहित केली जाणार आहे. यामुळे हजारो रहिवासी व झोपडपट्टीधारक बेघर होणार आहे. त्यामुळे पुनर्वसनाशिवाय हा प्रकल्प राबविण्यात यावा, यासाठी पूर्व नागपुरातील हिवरीनगर येथून मोर्चा काढून टाऊ न हॉलवर धडक देण्यात आली. यावेळी अनिल अहिरकर, दुनेश्वर पेठे व प्रशांत पवार आदींनी मार्गदर्शन केले. शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार यांना निवेदन देऊन प्रकल्प पुनर्वसनाशिवाय राबविण्याची मागणी केली. आंदोलनात विभागीय अध्यक्ष रवींद्र इटकेलवार,प्रकाश मेश्राम, शब्बीर विद्रोही, रियाज सय्यद, चेतन तोतडे, शरद शाहू, राजू भोयर, रियाज शेख, नरेंद्र शाहू यांच्यासह शेकडो झोपडपट्टीधारक सहभागी झाले होते.पुनर्वसनानंतरच प्रकल्प राबविणारनागनदी सौंदर्यीकण प्रकल्पात बाधित होणाऱ्यांचे आधी पुनर्वसन करण्यात येईल. त्यानंतरच हा प्रकल्प राबविला जाणार आहे. कुणालाही विस्थापित करून हा प्रकल्प राबविला जाणार नाही, अशी भूमिका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची असल्याचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी स्पष्ट केले. नागनदी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव स्थापत्य समितीकडे अभ्यासासाठी परत पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.जागेवरील आरक्षण बदलू देणार नाहीपारडी दहनघाटलगत सरस्वती तलमले यांच्या मालकीच्या जमिनीवर दहनघाट, शाळा, बाजार, रुग्णालय यासाठी विकास आराखड्यात जागा आरक्षित आहे. परंतु महापालिके च्या अधिकाऱ्