मुंबई/वर्धा : “मी काही उत्कृष्ट काम वगैरे करीत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, डॉक्टर्स, निमवैद्यकीय कर्मचारी, कंपाउंडर्स, पॅरामेडिकल आणि सरकारी कर्मचारी जिवाची बाजी लावून दिवस-रात्र काम करत आहेत,” असे केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी म्हणाले.
वर्धा येथे बोलताना गडकरी म्हणाले, “ सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला आहे. सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष मध्ये न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे. सर्व लोक करत असून आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत.” सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, आपण कोरोना महामारीचा सामना करून नक्कीच टिकू.
मागणी काय?n भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनीही कोरोनावरून केंद्र सरकारला घरचा आहेर दिला.n पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. त्यानंतर गडकरी यांनी वरील प्रतिक्रियादिली.