लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पैसे देणारे अनेक भेटतील, पण प्रामाणिकपणे काम करणाºया व्यक्ती मात्र भेटणार नाहीत. त्यांची वानवा असते. त्यामुळे पैशापेक्षा प्रामाणिकपणे काम करणाºया व्यक्ती हे नेहमी मोठेच असतात. चांगले काम करणाºया अशा व्यक्तींना, लोकांना नेहमीच शक्य ती मदत करावी, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.गांधीसागर महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुरुवारी निधी समर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, आ. सुधाकर कोहळे. आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधीर पारवे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी महापौर प्रवीण दटके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, मनपा सत्ता पक्षनेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, बंडू राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यंदा ६१ व्या वर्षांत पदार्पण केले. गेल्या २७ मे रोजी त्यांचा वाढदिवस कस्तूरचंद पार्कवर जाहीरपणे साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गडकरी यांना भाजपाचे सर्व आमदार, खासदार व पदाधिकाºयांनी मिळून एक कोटी रुपयांची थैली भेट दिली होती. यामध्ये आपल्यावतीने आणखी एक कोटी रुपये टाकून हा निधी समाजात काम करणाºया विविध सामाजिक सेवाभावी संस्थांना समर्पित करण्याची घोषणा त्यावेळी नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानुसार एक समिती तयार करण्यात आली. या समितीने समाजातील विविध संघटनांची माहिती एकत्र केली. अनेक संघटनांनी स्वत:ही अर्ज केले. यामध्ये वृद्धाश्रम, दिव्यांग, मूक-बधिर, अल्पसंख्यक, पर्यावरण, गोरक्षा, आरोग्य आदी विविध क्षेत्रात काम करणाºया अशा ११० सामाजिक संघटनांची यादी तयार करून त्यांना गुरुवारी नितीन गडकरी यांच्यावतीने धनादेश स्वरूपात निधी समर्पित करण्यात आला तर काही संस्थांना वस्तूस्वरूपात मदत करण्यात आली.यावेळी गडकरी म्हणाले, प्रामाणिकपणे काम करणाºया संस्थांना आर्थिंक अडचणींचा मोठा सामना करावा लागतो. याची मला चांगली जाणीव आहे. मी काही मोठे काम केलेले नाही. जे लोक प्रतिकूल परिस्थितीत कसे काम करतात, हे मी जवळून पाहिले आहे. समाजात खूप समस्या आहेत. आकाशच फाटले आहे, काय काय शिवणार, पण आपले पोट सांभाळून लोकांना मदत करावी हा स्वभाव असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.धापेवाडा येथे २५ लाख रुपये खर्चून अन्नपूर्णा नावाने एक भव्य जेवणाची व्यवस्था केली आहे. ‘ना नफा ना तोटा’तत्त्वावर हे चालवले जाईल. एकाच वेळी पाच हजार लोक जेवू शकतील, अशी व्यवस्था असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. एक हजार एकल शाळा सुरू व्हाव्यात, असा आपला प्रयत्न आहे. वृद्धाश्रमालाही शौचालय बांधण्यासाठी मदत करण्यात आली आहे. ही मदत या निधीव्यतिरिक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करताना अनेक चांगले प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी जवळून पाहता आली. शोषित, पीडित, दलित यांना परमेश्वर मानून त्यांची सेवा करावी, हे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे सामाजिक व आर्थिक चिंतन असून, तीच आमची प्रेरणा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आ. अनिल सोले यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी संचालन केले. डॉ. राजीव पोतदार यांनी आभार मानले.माझे नाव कुठेही लिहू नकाहा निधी आपण सामाजिक जाणिवेतून अर्पण करीत असल्याचे सांगितले. हा निधी मी दिला म्हणून माझे नाव संस्थेत कुठेही लिहू नये. या निधीचा केवळ योग्य विनियोग करावा, अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.कोल्हे दाम्पत्याला अॅम्ब्युलन्सयावेळी कोलूपूर धारणी जि. अमरावती येथील डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांच्या द प्रेयर या संस्थेला एक अॅम्ब्युलन्स भेट देण्यात आली. ही अॅम्ब्युलन्स आपल्याला मालकाने नि:शुल्क दिल्याने ती या मदतीत मोडत नसल्याचे गडकरी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. तसेच आम्रपाली उत्कर्ष संघ, विमलाग्राम- रामभाऊ इंगोले, योगाभ्यासी मंडळ रामनगर-रामभाऊ खांडवे यांना निधी देण्यात आला. याशिवाय आदासा कळमेश्वर येथील मोतीश्री वृद्धाश्रमास (संजय निमजे) नूतनीकरण, ३५ शौचालय व बाथरूम, एअर कूलर, टीव्ही, भारतीय स्त्री शक्ती (पद्मा चांदेकर) या संस्थेला दोन एसी व एक फ्रीज, कल्याण मूकबधिर विद्यालय रेशीमबाग (शैलजा सुभेदार) यांना दोन लॅपटॉप, ज्ञानदीप कॉलेज आॅफ अॅडमिनिस्ट्रेशन -एम.डी. वाहाने, (स्पर्धा परीक्षा पुस्तके), भारतीय उत्कर्ष मंडळ-गोशाळा प्रकल्प खापरी- शिरीष वटे व अतुल मोहरील, ३ हजार स्क्वेअर फुटाचा गोठा बांधून देणार, श्रीरामचंद्र देवस्थान मांडगाव समुद्रपूर जि. वर्धा (नारायण पाहुणे) वॉटर कूलर आरओ सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यांच्यासह ११० संघटनांना निधी वितरीत करण्यात आला.
प्रामाणिकपणे काम करणाºया व्यक्ती मोठ्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:14 AM
पैसे देणारे अनेक भेटतील, पण प्रामाणिकपणे काम करणाºया व्यक्ती मात्र भेटणार नाहीत. त्यांची वानवा असते. त्यामुळे पैशापेक्षा प्रामाणिकपणे काम करणाºया व्यक्ती हे नेहमी मोठेच असतात.
ठळक मुद्देनितीन गडकरी : राज्यातील ११० सामाजिक संघटनांना दोन कोटींचा गौरव निधी समर्पित