उपराजधानीत मिशन जीएसटी : कर टप्प्यांवर संभ्रम लोकमत न्यूज नेटवर्क जीएसटी कराच्या टप्प्यांमुळे कोणत्या वस्तूंवर किती कर लागला आणि त्याचा नागरिकांना फायदा काय? यावर लोकमतने नागरिक आणि विविध व्यापारी संघटनांसोबत चर्चा केली. काही वस्तूंवरील जीएसटीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली, तर व्यापाऱ्यांनी संगणकाचा अवलंब करावा लागेल, असे मत व्यक्त केले. जीएसटीमुळे व्यवसायात पारदर्शकता येणार असल्याचा सूर व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. जीएसटीमुळे मोबाईल बिल, आयुर्विमा पॉलिसी, बँकिंग सेवा, गुंतवणूक व्यवस्थापन सेवा, वाय-फाय सेवा, डीटीएच सेवा, तिकिटांचे आॅनलाईन बुकिंग महाग झाले आहे. जीवनावश्यक वस्तू शून्य कराच्या टप्प्यात असल्यामुळे जीएसटीचा गरीब आणि सामान्यांवर काहीही परिणाम झालेला नाही. मात्र श्रीमंतांच्या आवश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. केकवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. ‘कर’ एक सूर अनेक ! त्यामुळे वाढदिवस साजरा करणेही महाग झाले आहे. आयटी उत्पादनांवर १८ टक्के आकारणीमुळे संबंधित उत्पादने आणि सेवा महाग झाल्या आहेत. त्यात सॉफ्टवेअरचाही समावेश आहे. जीएसटी समजायला आणखी तीन महिने वाट पाहावी लागेल, असा सीएंचा सूर होता. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर सामान्य आणि लक्झरियस या वर्गवारीनुसार अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या कंपन्यांनी विक्री थांबविली आहे. या बाजारपेठेत उत्साह संचारण्यासाठी एक महिना वाट पाहावी लागेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. जीएसटीमुळे सोने खरेदीदार नाराज आहेत. आता सोन्याचे बिलिंग संगणकावर होणार असल्यामुळे ग्राहकांना सोन्याची खरेदी जीएसटी जोडून करावी लागेल. सोन्यावरील जीएसटी एक टक्क्यावर आणण्याची सराफा व्यावसायिकांची मागणी आहे. जीएसटीमुळे कमी किमतीची घरे खरेदीवर दिलासा आहे, पण लक्झरियस घरांच्या किमती वाढणार आहे. पोलाद १८ टक्के टप्प्यात आहे. याशिवाय बिल्डिंग मटेरियलच्या किमती वाढण्याची शक्यताआहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करणेही महाग झाले आहे. आयटी उत्पादनांवर १८ टक्के आकारणीमुळे संबंधित उत्पादने आणि सेवा महाग झाल्या आहेत. त्यात सॉफ्टवेअरचाही समावेश आहे. जीएसटी समजायला आणखी तीन महिने वाट पाहावी लागेल, असा सीएंचा सूर होता. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर सामान्य आणि लक्झरियस या वर्गवारीनुसार अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या कंपन्यांनी विक्री थांबविली आहे. या बाजारपेठेत उत्साह संचारण्यासाठी एक महिना वाट पाहावी लागेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. जीएसटीमुळे सोने खरेदीदार नाराज आहेत. आता सोन्याचे बिलिंग संगणकावर होणार असल्यामुळे ग्राहकांना सोन्याची खरेदी जीएसटी जोडून करावी लागेल. सोन्यावरील जीएसटी एक टक्क्यावर आणण्याची सराफा व्यावसायिकांची मागणी आहे. जीएसटीमुळे कमी किमतीची घरे खरेदीवर दिलासा आहे, पण लक्झरियस घरांच्या किमती वाढणार आहे. पोलाद १८ टक्के टप्प्यात आहे. याशिवाय बिल्डिंग मटेरियलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. नागपूर : जीएसटीचा शंखनाद ३० जूनच्या मध्यरात्री झाला. उपराजधानीत पहिल्याच दिवशी नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये जीएसटीवर चर्चा होती. केंद्र सरकारने रिटर्न भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत वेळ दिल्यामुळे व्यापाऱ्यांना जीएसटी समजून घेण्यास आणि अंमलबजावणीसाठी वेळ मिळणार आहे. पण व्यापाऱ्यांनी पहिल्याच दिवसापासून जीएसटी कर आकारणी करून वस्तूंची विक्री सुरू केल्याचे बाजारात चित्र होते.
‘कर’ एक सूर अनेक !
By admin | Published: July 02, 2017 2:19 AM