नागपूर : महापालिकेत मागील दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत भाजप नेतृत्वातील नागपूर विकास आघाडीने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा ‘संकल्प’ असलेला महापालिकेचा सन २०१६-१७ या वर्षाचा २०४८.१३ कोटींचा अर्थसकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी रविवारी विशेष सभेत सादर केला. ई रिक्षा योजनाशहरातील गरीब रिक्षा चालकांना व अपंगांना ई-रिक्षा उपलब्ध केली जाणार आहे. यात महापालिकेचा वाटा राहणार आहे. अभिन्यासाचा विकासशहरातील ७२ व १९०० ले-आऊ टमधील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.उद्यान सुधारणाशहरात ८३ उद्याने आहेत. या उद्यानात विकासाची कामे केली जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात ४.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अमृत प्रकल्प केंद्र शासनाने अटल मिशन फॉर रिज्युनिव्हेशन अॅन्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन (अमृत) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व मलजल व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.विक्रमी झेंडामहापालिकेने राष्ट्रीय दृष्टिकोन लक्षात घेता देशातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वजस्तंभ व राष्ट्रीय ध्वज उभारण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाच्या निविदेची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीसाठी लवकरच हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. या ध्वजस्तंभाला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतील, अशी अपेक्षा आहे.आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला मौजा सोमलवाडा, खामला व जयताळा येथील ३२.४८ हेक्टर जागेवरील आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ३५०० कोटींचा हा प्रकल्प असून विकासकाकडून प्रतिसाद मिळाल्यास या वर्षात प्रकल्पाचे काम सुरू होईल. यातून महापालिकेला आर्थिक वर्षात २०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.विद्यार्थी सुरक्षा विमा योजनामहापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, खेळणी उपलब्ध करणे, आधुनिक प्रयोगशाळांचे निर्माण, स्नेहसंमेलन, शाळांची दुरुस्ती, शालेय गणवेश व साहित्य वाटपासाठी तरतूद विद्यार्थी व कर्मचारी सुरक्षा विमा योजना राबविली जाणार आहे.पुतळ्यांचे निर्माणशहराच्या विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज, राणाप्रताप, डॉ. श्रीकांत जिचकार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भित्तीचित्र निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. रस्ते सुधारणा कार्यक्रम शहरातील रस्ते विकास व सुधारणा कार्यक्रम तीन टप्प्यात राबविला जात आहे. यातील पहिल्या दोन टप्प्यासाठी २६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात नासुप्रकडून १०० कोटी मिळणार असून, महापालिकेचा १०० कोटींचा वाटा राहणार आहे.महिलांसाठी योजनाअपंगांच्या पुनर्वसनासाठी ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बाल विकासासाठी २.५० कोटींची तरतूद आहे. लाडली लक्ष्मी योजनेसाठी १ कोटीचंी तरतूद करण्यात आली आहे.तलाव व नद्यांचे पुनरुज्जीवन शहरात ११ तलाव व ३ नद्या आहेत. पुनरुज्जीवनासाठी आराखडा तयार केला आहे. तसेच ४.९८ कोटींचा सुधारित प्रकल्प राज्य शासनाकडे विचाराधीन आहे. गांधीसागर तलावाच्या सुशोभिकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.उत्तम परिवहन सेवाशहरातील नागरिकांना उत्तम परिवहन सेवा देण्यासाठी महापालिके ने या विभागाचा आकृतीबंध मान्य केला आहे. या विभागासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जेएनएनयुआरएम प्रकल्पजवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियानातंर्गत शहरात १९ प्रकल्प हाती घेण्यात आले. यातील १५ प्रकल्प पूर्ण झाले असून ४ प्रकल्प प्रगतिपथावर आहेत.अग्निशमन विभागासाठी तरतूदशहराचा होत असलेला विकास विचारात घेता अग्निशमन यंत्रणा बळकट करण्याचा प्रस्ताव आहे. निर्माण कार्यासाठी १५.५० कोटींची तरतूद केली आहे.खाऊ गल्ली होणारशहरातील रस्त्यांच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे ठेले उभे असतात. त्यांना मोकळ्या जागा उपलब्ध करून खाऊ गल्ली लवकरच निर्माण केल्या जाणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसनझोपडपट्टी पुनर्वसनाचे शहरात दहा प्रकल्प मंजूर आहेत. पुढील वर्षासाठी यात ३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फोटोपास व पट्टे वापट योजना राबविली जाणार आहे.अर्थसंकल्पात मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु गेल्या चार वर्षात जे प्रकल्प पूर्ण करता आलेले नाही. ते पुढील दहा महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेचे आर्थिक स्रोत मर्यादित असले तरी शासनाकडून अनुदान आणण्यात यश येईल. विकासासाठी पैशाची कमतरता भासणार नाही.अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची करवाढ प्रस्तावित नाही. बंडू राऊ त, अध्यक्ष स्थायी समिती
मनपाचे ‘मत’ बजेट
By admin | Published: March 28, 2016 2:48 AM