लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा बुधवारी मुंबईत धडक देणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. मंगळवारी सायंकाळी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते रेल्वेगाड्यांनी मुंबईकडे रवाना झाले.बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील जिजामाता उद्यान येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने नागपुरातून मंगळवारी विदर्भ एक्स्प्रेस तसेच दुरांतो एक्स्प्रेसने शेकडो कार्यकर्ते रवाना झाले. रेल्वेगाडी निघायच्या अगोदर सर्व जण नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाटावर एकत्र आले व सर्वांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ नारे लावले. एकाच ठिकाणी आरक्षण मिळू न शकल्याने कार्यकर्ते विविध डब्यांमध्ये बसले होते.इतर प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सर्वच जण घेत होते. अनेक आंदोलक दुपारच्या सुमारासच मुंबईकडे रस्तामार्गाने निघाले आहेत. शिवाय विदर्भातील इतर भागांतील कार्यकर्ते अगोदरच रेल्वेगाड्यांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती दुरांतो एक्स्प्रेसने जाणाºया आंदोलकांनी दिली.सर्व बाबींचे ‘आॅनलाईन अपडेट’मुंबईला गेल्यावर नेमके कुठल्या स्थानकावर उतरायचे, न्याहरी कुठे करायची, त्यानंतर भायखळ्याला कसे जायचे व तेथून आझाद मैदानाकडे येणाºया मोर्चात कसे सहभागी व्हायचे, याची संपूर्ण माहिती आंदोलकांना अगोदरच देण्यात आली आहे. यासंदर्भात सर्वांच्या मोबाईलवर ‘अपडेट्स’ टाकण्यात येत आहेत.रेल्वेची विशेष व्यवस्थामराठा क्रांती मोर्चात सहभागी होणारे कार्यकर्ते तिकीट काढूनच मुंबईकडे गेले. मात्र कार्यकर्त्यांची होणारी संभाव्य गर्दी व याचा फायदा घेऊन काही समाजकंटक विनातिकीट प्रवास करण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे फलाटांवर विशेष लक्ष देण्यात येत होते. प्रवेशद्वारावरच ६ ते ७ तिकीट तपासनीस उभे होते. शिवाय रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षेवर जास्त भर देण्यात आला होता.
एक मराठा, लाख मराठा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:05 AM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा बुधवारी मुंबईत धडक देणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. मंगळवारी सायंकाळी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते रेल्वेगाड्यांनी मुंबईकडे रवाना झाले.बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील जिजामाता उद्यान येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने नागपुरातून मंगळवारी ...
ठळक मुद्देमराठा मोर्चासाठी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना :रेल्वेगाड्यांमध्ये शिस्त पाळण्यावर भर