शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील नोकऱ्या जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:46 PM

राणे समितीने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणामुळे, ४०० ब्राह्मण वर्गातील नोकऱ्या जाणार असल्याची भीती समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे स्वतंत्र ब्राह्मण विकास महामंडळ नेमण्याची करणार मागणीनागपुरातून ३ आॅगस्टला ‘शंखनाद’

लोकमज न्यूज नेटवर्कनागपूर : राणे समितीने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणामुळे, जुलै २०१४ मध्ये राज्यात विविध सरकारी पदांवर नियुक्ती झालेल्या नोकरदार वर्गावर बेरोजगारीची टांगती तलवार उपसली गेली आहे. जवळपास १५०० नोकरदरांच्या नोकऱ्या जाणार असून, त्यात ४०० ब्राह्मण वर्गातील नोकऱ्या जाणार असल्याची भीती समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.जुलै २०१४ मध्ये सरळ सेवा भरतीअंतर्गत खुल्या गटात नोकरीभरती करण्यात आली होती. मात्र, राणे समितीच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही नोकर भरती रद्द होणार असून, त्याअनुषंगाने येत्या १५ दिवसात दीड हजारावर नोकरदार नोकरीमुक्त होणार असल्याची शंका देशपांडे यांनी व्यक्त केली. त्या अनुषंगाने ब्राह्मणांच्या सामाजिक व आर्थिक समस्या सुधारण्याच्या ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करण्याच्या मागणीसाठी ३ ऑगस्ट रोजी नागपुरातून ‘घंटानाद आंदोलना’चा शंखनाद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांच्या व्यतिरिक्त काहीही दिले नाही. म्हणूनच, मुख्यमंत्र्यांच्या शहरातूनच आंदोलनाचा बिगुल फुंकण्यात येणार असून, मुख्यमंत्र्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आंदोलनात शहरातील ४८ संघटना सहभागी होणार असून, यात वेदाध्ययन करणारे १०० गुरूजी एकसाथ शंखनाद करणार असल्याचे विश्वजित देशपांडे यावेळी म्हणाले. या आंदोलनात साधारणत: राज्यभरातून दहा हजारावर ब्राह्मण समाजातील नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.

अन्य मागण्याछत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील भव्य स्मारक तातडीने पूर्ण करावे.पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या श्रीवर्धन येथील जन्मस्थळाचा जीर्णोद्धार व्हावालंडन येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवासस्थान सरकारने विकत घेऊन स्मारक करावेशनिवारवाडा येथे पेशवे सृष्टी निर्माण करण्यात यावीकेजी ते पीजी शिक्षण मोफत व्हावेग्रामीण भागातील समाजबांधवांना संरक्षण द्याब्राह्मण महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करावाविद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावेमाहिती तंत्रज्ञान कायदा अधिक कडक व्हावा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण