सीआयएससीई निकाल : शाळांचे निकाल १०० टक्के नागपूर : द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)ने शुक्रवारी १० वी (आयसीएसई) आणि १२ वी (आयएससी) चे निकाल घोषित केले. १० वी मध्ये नागपूर विभागातून एमएसबी एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची मारिया अब्बासी हिने ९६.२ टक्के अंक घेऊन ‘टॉप’ केले तर १२ वी मध्ये चंदादेवी सराफ स्कूलचा विद्यार्थी अनिर्बान मुखर्जी याने ८९.४० टक्के अंकासह प्रथम क्रमांक घेतला. दहावीमध्ये चंदादेवी सराफ स्कूलचा विद्यार्थी धनराज श्रीवास्तव दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अब्बास इलेक्ट्रीकवाला ९५.४ टक्के अंक घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिला.निकालात सुधारणानागपूर : चंदादेवी सराफ विद्यालयाची विद्यार्थिनी महिमा कडवे हिने ९५.२ टक्के अंक घेऊन चौथा क्रमांक पटकाविला. मारिया आणि धनराज सीआयएससीईच्या आॅल इंडिया झोनच्या टॉप १० विद्यार्थ्यांमध्ये सामील आहेत. उल्लेखनीय म्हणजे सीआयएससीईने या वर्षी दोन्ही परीक्षांचे निकाल आठवडाभरापूर्वीच घोषित केले. यासोबतच १० वी व १२ वी चे निकाल घोषित करण्यात सीआयएससीई सर्वात पुढे आहे. यावर्षी सर्व शाळांच्या निकालात चांगली सुधारणा झाली. सीआयएससीईचे निकाल घोषित झाल्याने आता दुसऱ्या बोर्डातील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. (प्रतिनिधी)
मारिया व अनिर्बान उपराजधानीत टॉपर
By admin | Published: May 07, 2016 2:53 AM