लोकमत न्यूज नेटवर्ककोंढाळी : मागील काही वर्षांपासून काटोल तालुक्यातील कोंढाळी परिसरात विविध फुलांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यासाठी काही शेतकºयांनी त्यांच्या शेतात आवश्यक त्या सुविधांची निर्मितीही केली आहे. या भागात इतर फुलांसोबतच झेंडूच्या फुलांचेही उत्पादन घेतले जाते. यावर्षी झेंडूला १०० रुपये प्रति किलो भाव मिळाल्याने फुल उत्पादक सुखावले. मागील वर्षी मात्र अत्यल्प भावामुळे याच शेतकºयांना त्यांच्या शेतातील झेंडूची फुले दिवाळीच्या काळात रस्त्याच्या कडेला व नाल्यात फेकावी लागली होती.फुलांच्या दर्जेदार उत्पादनामुळे कोंढाळी परिसर जिल्ह्यात प्रसिद्ध होत आहे. कोंढाळी परिसरातील जामगड, जुनापाणी, खुर्सापार, खापरी, कोंढाळी, दुधाळा, खैरी आदी गावांमधील शेतकरी मागील काही वर्षांपासून सोयाबीन, कपाशी, तूर, गहू, हरभरा यासह अन्य परंपरागत पिकांऐवजी विविध फुलांच्या उत्पादनाला प्रथम पसंती देतात. त्यामुळे या भागात खरीप व रबीची परंपरागत पिके फारशी दिसत नाही.या भागातील फुल उत्पादक पुणे, कर्नाटकातील बंगळुरू, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून विविध फुलांची रोपे मागवितात आणि फुलांची व्यावसायिक शेती करतात. फुलांचा उत्पादनखर्च अधिक असला तरी मागणी भरपूर असल्याने चांगला नफा मिळत असल्याची माहिती फुल उत्पादकांनी दिली.परिणामी, या भागात अनेक शेतकºयांनी पॉलिहाऊसची उभारणी केली असून, त्यात जरबेरा, ग्लॉडिओ यासह अन्य फुलांचे उत्पादन घेतात. दसरा व दिवाळीच्या काळात झेंडूच्या फुलांना बाजारात भरीव मागणी असल्याने या भागात झेंडूच्या फुलांचीही शेती केली जाते.मागील वर्षी दसरा व दिवाळीच्या काळात झेंडूच्या फुलांना फारच कमी भाव मिळाला. कारण, मागील वर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादन अधिक झाले होते तर तुलनेत मागणी कमी होती. त्यामुळे भाव मिळू शकला नाही.किंबहुना; उत्पादनखर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे फुले फेकून द्यावी लागली, अशी माहिती फूलउत्पादक जामगडचे विनोद रणनवरे यांनी दिली. यावर्षी आपण झेंडूऐवजी कपाशीची लागवड केल्याचेही त्यांनी सांगितले.
झेंडूच्या फुलांनी ‘शंभरी’ गाठली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:40 AM
मागील काही वर्षांपासून काटोल तालुक्यातील कोंढाळी परिसरात विविध फुलांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यासाठी काही शेतकºयांनी त्यांच्या शेतात आवश्यक त्या सुविधांची निर्मितीही केली आहे.
ठळक मुद्देफुल उत्पादक सुखावले : मागील वर्षी रस्त्यावर फेकली होती फुले