लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : श्री गणेश उत्सवानिमित्त खापा (ता. सावनेर) येथील मुख्य बाजारपेठेत गुरुवारी (दि. ९) नागरिकांची माेठी गर्दी दिसून आली. गर्दीतील ८० टक्के नागरिक काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची पायमल्ली करीत असल्याचेही प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. नागरिकांचा हा बेफिकीरपणा काेराेनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णवाढीस कारणीभूत ठरू शकताे, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी दिली.
सध्या खापा शहरात काेराेनाचा एकही रुग्ण नाही. संक्रमण कमी हाेताच राज्य सरकारने टाळेबंदीचे नियम शिथिल केले हाेते. मध्यंतरी शहरातील मुख्य बाजारात ग्राहकांची फारशी गर्दी दिसून येत नव्हती. श्री गणेश उत्सवानिमित्त विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरातील किमान ८० टक्के नागरिक घराबाहेर पडले हाेते. त्यामुळे शहरातील मुख्य बाजार व भाजीबाजार तसेच बाजाराच्या परिसरात नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती.
बाजारपेठेतील गणपती मूर्ती विक्रेते, किराणा, कापड, ज्वेलरी, रेडीमेड कपड्यांची तसेच भांड्यांच्या दुकानांसमाेर सर्वाधिक गर्दी दिसून आली. हा संपूर्ण प्रकार स्थानिक नगरपालिका प्रशासनाला माहिती हाेता. मात्र, प्रशासनाने पाेलिसांच्या मदतीने ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययाेजनांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तसदी घेतली नाही.
...
प्रशासन सुस्त
शहरातील बाजारात फिरणारे व खरेदी करणाऱ्यांपैकी ८२ ते ८५ टक्के नागरिकांच्या ताेंड व नाकावर मास्क अथवा रुमाल बांधलेला नव्हता. अनेकांसाेबत त्यांच्याकडील छाेटी मुलेदेखील हाेती. खरेदी करताना दुकानदार व ग्राहक फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करीत नव्हते. दुकानदारांकउे सॅनिटायझरही दिसून आले नाही. या गर्दीत काेण आजारी आहे व काेण निकाेप आहे, हे देखील कळायला मार्ग नव्हता.
...
सध्या सण व उत्सवांचे दिवस आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचे आधीच संकेत दिले हाेते. याबाबत प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. आधीचा अनुभव लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागायला पाहिजे. प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकाेर पालन करावे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
- डाॅ. ऋचा धाबर्डे, मुख्याधिकारी,
नगरपालिका, खापा.
090921\5357img_20210909_143430.jpg
खापा बाजारातील फोटो