लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने परवानगी देऊ नये आणि रिटेलमध्ये विदेशी गुंतवणुकीचा विरोध करताना देशातील सात कोटी रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन आॅफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पुकारलेला शुक्रवार, २८ सप्टेंबरचा भारत बंद व्यापाऱ्यांच्या एकजुटतेमुळे १०० टक्के यशस्वी झाला. नागपुरातील सर्व व्यापाऱ्यां
पेट्रोल पंप दुपारी १२ ते ४ बंदभारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर असोसिएशने घेतला होता. निर्णयानुसार शुक्रवारी नागपुरातील पंप दुपारी १२ ते ४ या वेळात बंद होते. वाहनचालकांच्या माहितीसाठी पंपावर आधीच बंदचे बोर्ड झळकत होते. पण बंदची माहिती नसल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. दुपारी ४ नंतर पंप सुरू झाल्यानंतर सर्वच पंपावर वाहनचालकांची गर्दी होती.
होलसेल क्लॉथ मार्केटमध्ये तणावभारत व्यापार बंद आंदोलनादरम्यान गांधीबाग येथील होलसेल क्लॉथ मार्केटमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला. या बाजारपेठेत पोहोचलेल्या नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना गांधीबाग कापड संघटनेने बंदला समर्थन न दिल्यामुळे मार्केटमधील दुकाने बंद होणार नाहीत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. यावर दोन्ही गट हमरीतुमरीवर आले. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हे प्रकरण शांत केले. त्यानंतर क्लॉथ मार्केटमधील दुकाने सुरू असल्याचे वृत्त होते.
मॉ विदर्भ चंडिका मंदिरात महाआरतीभारत व्यापार बंद आंदोलनाची सुरुवात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता शहीद चौकातील मॉ विदर्भ चंडिका मंदिरात महाआरतीने झाली. एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी आणि कॅटचे नागपूरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर यांनी महाआरती केली. यावेळी एफडीच्या विरोधात बंद यशस्वी करण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले.
कळमना बाजारात व्यवसाय ठप्प कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना येथील पं. जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डममध्ये भारत बंदचा परिणाम दिसून आला. शुक्रवारी धान्य बाजारात व्यवसाय ठप्प होता. पण फळे आणि भाजी बाजारात व्यापाऱ्यांची दुकाने खुली असल्याचे दिसून आले. अर्थात कळमन्यात संमिश्र प्रतिसाद दिसला.
ग्राहक खरेदीविना परतलेभारत बंद आंदोलनाची माहिती ग्राहकांना नसल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्राहकांना खरेदीविना परतावे लागले. इतवारी आणि महाल येथील गारमेंटची दुकाने बंद होती. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करता आली नाही. सीताबर्डी मुख्य बाजारपेठ, खामला, जरीपटका आणि बडकस चौकातील दुकाने पूर्णत: बंद होती.
एनव्हीसीसीतर्फे व्यापाऱ्यांचे अभिनंदनचेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली बंद यशस्वी करण्यासाठी चेंबरच्या एफडीआयविरोधी समितीचे संयोजक राजू माखिजा यांनी त्यांची चमू, चेंबरचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, चेंबरशी संलग्न व्यापारी संघटनांचे अध्यक्ष, सचिव, व्यावसायिक प्रतिनिधी, सदस्य आणि व्यापाऱ्यांचे अभिनंदन केले. बंद यशस्वी करण्यासाठी चेंबरचे माजी अध्यक्ष गोविंदलाल सारडा, प्रकाश वाधवानी, प्रकाश मेहाडिया, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, अश्विन मेहाडिया, फारुखभाई अकबानी, सचिव संजय के. अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव स्वप्निल अहिरकर, कार्यकारिणी सदस्य रमण पैगवार, प्रताप मोटवानी, मनोज लटुरिया, गजानंद गुप्ता, हरगोविंद मुरारका, संतोष कावडा, मनुभाई सोनी, शंकर सुगंध, प्रभाकर देशमुख, महेशकुमार कुकरेजा, राजेश ओहरी, राजेश पटेल, किशोर धाराशिवकर, अशोक आहुजा, राजेश काटकोरिया, राजेश मुनियार, हुसेनभाई अजानी, सलीम अजानी, गणेश चौरिया, दिनेश छाबडा, अशोक सोनी, अलीभाई निमचवाला, स्वप्निल वांद्रे, प्रदीप साठे, प्रवीण गुप्ता, मनोज शाहू, विजय दहीकर, संजय ताबुतवाला, पंकज पडिया, राजेश लखोटिया, सूर्यकांत अग्रवाल, योगेश बंग, जयंत बडवार, राजेश रोकडे, विक्रम आहुजा, ओंकारेश्वर, गौरव, पुरुषोत्तम कावळे, रामचंद्र येरपुडे, चंद्रकांत अरमरकर, विशाल पारेख, रविकांत हरडे, मुकेश पारेख, विजय धारीवाल, मंगेश डांगे, राजेश पटेल, योगेश बंग,अनिल सारडा, सुरेश सोमानी, संतोष शर्मा, ललित पटेल, अनिस खान, सुभाष अग्रवाल, विजय मेहाडिया, संदीप बावने, मनोज मिरपुरी, विजय अग्रवाल, विजय केवलरामानी आणि अनेक व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला.
कन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन असो.ची रॅलीबंदचे समर्थन करताना कन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन असोसिएशनने चेंबरच्या प्रांगणातून दुपारी ३ वाजता रॅली काढली. रॅलीत असोसिएशनचे अध्यक्ष पुनीत कुसुमगर, सचिव आनंद भुतडा, आयोजक सचिव सुभाष जोबनपुत्रा, सदस्य जॅकी फुलवानी, अशोक वियानी, दीपक कोठारी, संदीप अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.