नागपूर : कोरोना संक्रमणाने जगण्याची पाऊलवाटच बदलवली आहे. संक्रमण रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखण्याचा प्रयत्न सर्वत्र होताना दिसत आहे. गर्दीवरही बंधन असून मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक कार्य करण्याची अनुमती आहे. याचा परिणाम विवाह, सत्यनारायणासारखे धार्मिक विधीही आता ऑनलाइन व्हायला लागले आहेत. नागपुरातील नागरिकांनी आणि पुरोहितांनी हा नवा मार्ग पत्करला आहे.
मागील वर्षभरापासून कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन होते. आता अलीकडे अनलॉकमध्ये व्यवहार सुरू झाले असले तरी गर्दी टाळण्यावरच अनेकांचा भर आहे. हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा ऑनलाइन पूजेचा मध्यम मार्ग या काळात स्वीकारला गेला. नेटवर्क चांगले असले तर कसलाही अडथळा येत नसल्याने ही खबरदारी घेऊनच अनेकांनी ऑनलाइन पूजा उरकून घेतल्या. या पद्धतीत यजमानांचे फिडबॅक चांगले असल्याची प्रतिक्रया पुरोहितांनी व्यक्त केली आहे.
...
सध्या कुठले विधी होत आहेत ऑनलाइन?
सध्या सत्यनारायण, लघुरुद्र, उदकशांती, गृहप्रवेश, तेरवी यासारख्या पूजाविधी ऑनलाइन सुरू आहेत. लग्नकार्यामध्ये प्रत्यक्ष पुरोहिताची उपस्थिती असावी, याबद्दल अनेकांचा आग्रह असतो. मात्र अन्य पूजा ऑनलाइन करण्यास सहकार्य दिसत आहे.
...
...
पूजेला आले तरी मास्क
ऑनलाइन पूजाविधी नको म्हणणाऱ्यांकडे ऑफलाइन विधी होत असले तरी यात आरोग्यविषयक नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे. पाच फुटावरून पूजा सांगणे, सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे, पूजा साहित्य, फळे निर्जंतुक करूनच वापरणे ही खबरदारी घेतली गेली. पुरोहितासह यजमान आणि सर्वांनाच मास्कचा आग्रह धरण्यात आला.
...
कोट
१) यापूर्वीच्या काळात अशी गरज पडली नाही. माध्यमेही उपलब्ध नव्हती. अशी वेळ येईल, असे वाटलेही नव्हते. मात्र एक पाऊल पुढे जाऊन संस्कृती जतनाचे काम होत आहे. ऑनलाइनमुळे हे शक्य झाले.
- नचिकेत काळे, पुरोहित, नागपूर
२) प्रत्यक्ष पूजा करणे आणि ऑनलाइन करणे यात बराच फरक आहे. मंत्रोच्चारणाचा वास्तूमध्ये ऑनलाइन पद्धतीत किती परिणाम पडणार? ही पद्धत आपणास चुकीची वाटते.
- पं. रामशास्त्री टोकेकर, नागपूर
...