मनपाची २३९४३ व्यक्तींविरुध्द कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १५२ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात पथकांनी २३९४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन १कोटी ३ लाख ३० हजार ,५०० रुपये दंड वसूल केला आहे.
मंगळवारी पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २३, धरमपेठ ३०, हनुमाननगर ८ धंतोली ११, नेहरुनगर १७, गांधीबाग ८, सतरंजीपूरा १२, लकडगंज १०, आशीनगर १५, मंगळवारी १३ आणि मनपा मुख्यालयातील ५ जणांविरुध्द ही कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात कारवाई सुरू आहे. नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे.