लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : कृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरीय रबी पीक स्पर्धा घेण्यात आली हाेती. यात आदिवासी व सर्वसाधारण गटातील गहू व हरभरा गटातून अनुक्रमे शंकर मसराम, रा. सालईमेढा, नामदेव खंडाते, रा. सीताखैरी, प्रदीप बंग, रा. उखळी, अरुण देवतळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कृषी दिनानिमित्त हिंगणा येथे आयाेजित कार्यक्रमात यासह अन्य शेतकऱ्यांचा गाैरव करण्यात आला. शिवाय, शेतकऱ्यांना किडींच्या जैविक व रासायनिक नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी अरुण देवतळे हाेते तर मार्गदर्शक म्हणून कृषी विद्यापीठाचे सहायक प्रा. डाॅ. नंदकिशाेर लव्हे, प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे उपस्थित हाेते. यावेळी डाॅ. नंदकिशाेर लव्हे यांनी शेतकऱ्यांना कापूस व साेयाबीन पिकांवरील विविध किडी व त्यांच्या नियंत्रणासाठी जैविक व रासायनिक उपाययाेजनांबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आदिवासी गटातील गहू उत्पादक शंकर मसराम, सालईमेंढा (प्रथम क्रमांक), सुनील मडावी, भान्साेली (लाेधा) (द्वितीय), सुखदेव खंडाते, सीताखैरी (तृतीय), हरभरा उत्पादक नामदेव खंडाते, सीताखैरी (प्रथम), माराेती सलाम, गाेठणगाव (द्वितीय), सर्वसाधारण गटातील गहू उत्पादक प्रदीप बंग, उखळी (प्रथम), संमतीप्रसाद पटले, मांडवा (द्वितीय), संजय घाेडे, उखळी (तृतीय), हरभरा उत्पादक अरुण देवतळे, धानाेली (गुजर) (प्रथम), प्रशांत चिंचूलकर, गुमगाव (द्वितीय) व जयवंत पिंपरे, धाेकर्डा (तृतीय) यांचा अतिथींच्या हस्ते गाैरव करण्यात आला.
मंडळ कृषी अधिकारी रामू धनविजय यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. संचालन कृषी पर्यवेक्षक युवराज चाैधरी यांनी केले. कार्यक्रमाला कृषी विस्तार अधिकारी मेश्राम, उईके, रामटेके, तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक काळसर्पे, शिंदे, आत्माचे प्रशांत शेंडे, बन्साेड यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित हाेते.