लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेबाबत तसेच डेंग्यूविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिके च्या झोन कार्यालयातर्फे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन क रण्यात आले. मात्र महापालिके चा आरोग्य व शिक्षण विभाग असलेल्या इमारतीच्या टेरेसवर मागील काही महिन्यापासून ठेवण्यात आलेल्या भंगारामुळे पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याचा धोका आहे. असे असूनही महापालिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचाच भाग असलेल्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे बुधवारी दहाही झोनमध्ये गप्पीमासे वितरण प्रभातफेरी काढण्यात आली. यात महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक , अधिकारी सहभागी झाले होते. यात नागरिकांना डेंग्यू आजाराची माहिती दिली. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. एवढेच नव्हे तर उपस्थित नागरिकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्याबाबतची शपथ घेली. नागरिकांना आरोग्य शिक्षण व कीटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान पत्रके वाटून, स्टीकर, पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली. मात्र महापालिका मुख्यालयात पडून असलेल्या भंगारामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारापुढे ठेवण्यात आलेल्या भंगाराबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतरही अधिकारी याची दखल घेत नसेल तर जनजागृतीचे उपक्रम कशासाठी राबविले जातात, असा प्रश्न महापालिकेत येणाऱ्यांना नागरिकांना पडतो.
नागपुरातील मनपाच्या आरोग्य विभागाच्या टेरेसवर डासांची उत्पत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:35 AM
स्वच्छतेबाबत तसेच डेंग्यूविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिके च्या झोन कार्यालयातर्फे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन क रण्यात आले. मात्र महापालिके चा आरोग्य व शिक्षण विभाग असलेल्या इमारतीच्या टेरेसवर मागील काही महिन्यापासून ठेवण्यात आलेल्या भंगारामुळे पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याचा धोका आहे. असे असूनही महापालिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठळक मुद्देनागरिकांना मात्र डेंग्यूविषयी काळजी घेण्याचे आवाहन