मंगेश व्यवहारे नागपूर : पूर्व नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साठविलेला कचऱ्या ढिगाऱ्याला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास भिषण आग लागली. आगीचा धुर परिसरातील पवनशक्तीनगर, सूरजनगर, संघर्षनगर, अब्बूमियाँनगर, तुलसीनगरात पसरलेला आहे.
कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे बऱ्याच काळापासून असल्याने आगीमुळे त्यात स्फोटही होत आहे. आगीचा धुराळा दोन किलोमीटरपर्यंत दिसत असून, भांडेवाडी लगतच्या वस्तीतील घरांमध्ये धुर पसलेला आहे. आगीची भिषणता लक्षात घेता, लकडगंज, वाठोडा, सक्करदरा, कळमना, त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्रातून फायर टेंडरसह अग्निशमन पथक रवाना झाले आहे.