मौदा : मौद्यात राष्ट्रीय महामार्गालगत स्मशानभूमी परिसरात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती नगरपंचायत कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी आगी विझविण्याचा प्रयत्न सुरू केले. चार तासात पाणी व झाडांच्या फांद्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. यात काही प्रमाण झाडे जळून खाक झाली. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. परंतु एखाद्या शेतकऱ्याने धुऱ्यावरील कचरा जाळण्यासाठी आग लावली; पण ती विझविण्यात असमर्थ ठरला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग विझविण्यासाठी लिपिक नरेंद्र बिसेन, कर संकलक उपासराव कोहाड, पर्यवेक्षक साजन पसेरकर यांनी प्रयत्न केले. आग लागलेल्या स्थळापासून नगरपंचायतचे डम्पिंग यार्ड जवळच आहे. मात्र आगीवर वेळीच नियंत्रण आणण्यात आल्याने मोठा अनर्थ ठरला.
मौद्यात राष्ट्रीय महामार्गालगत भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:07 AM