शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

अवैध दारूविक्री रोखण्यासाठी 'मास्टर प्लॅन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:52 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेदरम्यान अवैध दारूचे उत्पादन, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे.

ठळक मुद्देदारू कंपनी, गोदाम, परमिट बार, वाईन शॉप, बीअर शॉपी व देशी दारूच्या दुकानात लावले सीसीटीव्ही कॅमेरेजिल्ह्यातील हातभट्टी अड्ड्यांवर राहणार अधिकाऱ्यांची करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेदरम्यान अवैध दारूचे उत्पादन, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस स्टेशननिहाय २० अवैध दारूच्या अड्ड्यांचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. या अड्ड्यांवर विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष नजर ठेवली जाईल.संबंधित पथक या अड्ड्यांवर सातत्याने गस्त घालत राहील. यासोबतच सायंकाळी दारू विक्री करणारे हॉटेल, ढाबे आणि भोजनालयांवर धाड टाकली जाईल. या हॉटेल मालकांविरुद्ध महराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (ख)अंतर्गत कारवाई होईल. यात २५ हजार रुपयापर्यंत दंड आणि ३ वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. दुसरीकडे दारू पिणाऱ्यांवरही कलम ८४ अंतर्गत ५ हजार रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय डे ’ घोषित केल्यावर दारू विकणाऱ्या दुकानदाराचे परमिट रद्द केले जाईल. यासोबतच जिल्ह्याला लागू असलेले खुर्सापार, केळवद, सिरोंजी बडेगाव, चोरखैरी आदी ठिकाणी इतर राज्यातील येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाईल. यासाठी दिवसा एक दुय्यम निरीक्षक व जवान तर रात्रीच्या वेळी सहायक दुय्यम निरीक्षक व जवान तैनात राहतील. याशिवाय मध्य प्रदेशातील जिल्ह्यांना लागून असलेल्या सीमावर्ती मार्गावर ५ कि.मी.पर्यंत सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. निवडणूकदरम्यान १०२ होमगार्ड व ७ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत.कॅमेरे मोबाईलशी राहतील ‘कनेक्ट’विभागाने दारू कंपनी, गोदाम, परमिट बार, वाईन शॉप, बीअर शॉपी व देशी दारूचे दुकान, भट्टी आदींसमोर सीसीटीव्ही कॅमेर लावण्याची तयारी केली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल.या अड्ड्यांवर राहील नजरगिट्टीखदान - भिवसेनखोरीहिंगणा - किन्ही, शेषनगरबुटीबोरी- धवलपेठकळमेश्वर- गोंडखैरीकाटोल- डोंगरगाव, खानगाव, घुबडमेटकेळवद - तिडंगा, उमरी खदानरामटेक - नगरधन, सारकदेवलापार- पांचाला, दाहुदा, पिकदाउमरेड- दहेगाव, राजूरवाडीकुही - चांपाल, वडदभिवापूर- गरडेपार

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019liquor banदारूबंदी