शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

एमआयडीसीतील हत्याकांडाची मास्टरमाईंड गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी आरोपी मिनू (नावात बदल, वय १७) हिला तिचा प्रियकर जानसह (नावात बदल, वय १६) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे अमरावतीला ताब्यात घेतले.

मृत विजयाबाई यांची मिनू ही नात होय. ती आणि तिचा प्रियकर हे दोघेही अल्पवयीन असल्याचे आज स्पष्ट झाले.

विजयाबाई सप्तक नगरात एकट्या राहायच्या. त्यांच्या मुलीची मुलगी मिनू हिने आपल्या आईवडिलांचे घर सोडले होते. ती मित्रांसोबत राहायची. अधूनमधून आजी विजयाबाई यांच्याकडे यायची. आजीकडे १० ते १५ लाख रुपये

आणि दागिने असल्याचा अंदाज मिनूने बांधला होता. ती एकटीच असल्याने तिचा गेम करून रोकड तसेच दागिने लुटता येईल, आपले पाप कुणाच्या लक्षात येणार नाही, असे मिनूला वाटत होते. त्यानुसार तिने प्रियकर जानच्या मदतीने कट रचला.

जानचे साथीदार नीलेश पौनीकर, बाबा उर्फ कदिर खान, फरदीन खान आणि आरजू उर्फ मोहम्मद कमरे आलम यांना सहभागी करून घेतले. १० ते १५ लाख रुपये मिळणार म्हणून आरोपी त्यात सहभागी झाले आणि गुरुवारी मध्यरात्री त्यांनी विजयाबाईच्या गळ्यावर गुप्तीचे घाव घालून त्यांची हत्या केली. घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून आरोपी पळून गेले. शुक्रवारी दुपारी हे हत्याकांड उघड झाल्यानंतर खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त विवेक मासाळ यांनी व तपासावर लक्ष केंद्रित केले. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनीही आपली पथके चौकशीसाठी कामी लावली. ठाणेदार युवराज हांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजयाबाई यांची नात मिनू गायब असल्याचे कळाल्याने तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्यानंतर शनिवारी रात्री बाबा, नीलेश आणि फरदीन तसेच आरजूला पकडण्यात आले. त्यांनी हत्येची कबुली दिली.

---

औरंगाबादला जाणार होते

जान यापूर्वी अमरावतीला कामाला होता. तेथे त्याचे मित्र होते. आपले साथीदार पकडले गेल्याचे कळताच मिनू आणि जान अमरावतीला मित्राकडे पळून गेले. जानची मावशी औरंगाबादला राहते. तिच्याकडे जाण्याची त्यांची तयारी होती. मात्र, गुन्हेशाखेच्या पथकाने आज पहाटे २ च्या सुमारास अमरावतीत जाऊन या दोघांना ताब्यात घेतले.

----

सात दिवसांची कोठडी

या खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यासाठी एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग तीन दिवस धावपळ केली. त्यांना गुन्हे शाखेच्या पथकांनीही मदत केली. आज मिनू आणि जान हाती लागल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मिनू आणि जान वगळता अन्य चार आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली.

---