कळमेश्वर : अज्ञात चाेरट्याने दुकानात चाेरी करून राेख रक्कम व साहित्य असा अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना कळमेश्वर शहरातील निशा दत्त काॅम्प्लेक्स येथे गुरुवारी (दि. १६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
नितीन मनाेहरराव गेडाम (३३, रा. हुडकाे काॅलनी, कळमेश्वर) यांच्या मालकीचे निशा दत्त काॅम्प्लेक्स येथे किराणा व जनरल स्टाेर्स दुकान आहे. बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने दुकानातील साहित्य तसेच गल्ल्यातील तीन हजार रुपये सुटे पैसे तसेच राेख तीन हजार रुपये असा अंदाजे १५ ते २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक सावळा करीत आहेत.