लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील अंगणवाड्या अपग्रेड करण्यासाठी साहित्याचा पुरवठा न करताच जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ९८ लाख रुपयांच्या देयकाची रक्कम कंत्राटदाराला अदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी मुख्यलेखा व वित्त अधिकारी कुमुदिनी श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन महिला अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. यात समितीत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहीणी कुंभार व नागपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत यांचा समावेश आहे.
गठित करण्यात आलेली समिती महिला व बाल कल्याण विभागांतर्गत अंगणवाड्यांना श्रेणीवर्धन करण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीची संपूर्ण वस्तुनिष्ठ चौकशी करून सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सौम्या शर्मा यांनी चौकशी समितीला दिले आहे. ... तथ्य आढल्यास दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणारअंगणवाड्यांना साहित्याचा पुरवठा न करताच कंत्राटदाराला ९८ लाख रुपयांचे बील देण्यात आले आहे. वास्तविक कंत्राटदाराने मागणीप्रमाणे साहित्याचा पुरवठा केला आहे का, याची खात्री झाल्यानंतर पुरवठा झाला असेल त्याच साहित्याची देयके अदा करण्यात यावी असे विभागाचे आदेश आहेत. परंतु साहित्याचा पुरवठा झाला नसतानाही कंत्राटदाला ९८ कोटींचे बील देण्यात आले आहे. यात तथ्य आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.