शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

मातृत्व ही भावनाच वैश्विक

By admin | Published: May 08, 2016 2:53 AM

बाळ जन्माला येते तेव्हा त्याला कुठलीही भावना कळत नाही. ओळख नसतेच. पण एका व्यक्तीचा स्पर्श त्याला आपलासा वाटतो. रडणारे बाळ या एका स्पर्शाने आश्वस्त होते.

अपत्यांसाठी आईच असते त्यांचे जग नागपूर : बाळ जन्माला येते तेव्हा त्याला कुठलीही भावना कळत नाही. ओळख नसतेच. पण एका व्यक्तीचा स्पर्श त्याला आपलासा वाटतो. रडणारे बाळ या एका स्पर्शाने आश्वस्त होते. ती फक्त आईच असते. आईच्या पोटातूनच ही आपुलकीची जाणीव कदाचित विकसित होत असावी. पण लहान बाळाला फक्त आईच कळत असते. ममत्वाच्या भावनेपुढे सारे धर्मभेद, प्रांत, भाषा गळून पडतात. मातृत्व ही भावना त्यामुळेच वैश्विक आहे. आई प्रत्येकाच्या आयुष्यातील हळवी जागा आहे. मनाच्याही गाभाऱ्यात सदैव असणारी एक मूर्ती म्हणजे आई. भारतीय संस्कृतीत तर मातेला देवतेचा दर्जा दिला आहे. आपल्या अपत्यांसाठी झटणारी, प्रत्येक क्षणाला त्यांची काळजी करणारी, जपणारी, रडणारी, हसणारी आणि अत्यंत प्रामाणिक असणारी असते ती आईच. हे रसायनच विलक्षण आहे. ते निसर्गाने निर्माण केले आहे. ते कृत्रिम होतच नाही. बाळाला जन्म देण्यासाठी आनंदाने प्रसववेदना सहन करणारी आणि जन्मानंतर अपत्यांचा सांभाळ करणारी आईच. आयुष्यातील प्रत्येकाचे पहिले पाऊल आईच्याच साक्षीने. त्यानंतरचे धावणे आणि जीवनाच्या संघर्षात वेळोवेळी सांभाळून घेणारे स्थान म्हणजे आईच. आई साऱ्यांचेच आयुष्य व्यापून उरते. जगातील सर्वाधिक शक्तिशाली पुरुषही त्याच्या आईपुढे नतमस्तक होतो, कारण कुठलीही शक्ती मातृत्वाच्या भावनेपुढे फिक्की ठरते. आपल्या संस्कृतीत शक्तीचे स्वरूप म्हणून देवीलाच पूजले जाते. यामागे मातृत्वाचाच सलाम आहे.(वृत्त/४)