लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवारात विहिरीतील माेटारपंप, केबल तार, पाईप चाेरीचा चाेरट्यांनी धुमाकूळ घातला हाेता. दरम्यान, शेतातील माेटारपंप व पाईप चाेरणाऱ्या टाेळीला अटक करण्यात नरखेड पाेलिसांना यश आले. या चाेरट्यांकडून एकूण ९९ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली. ही कारवाई शनिवारी (दि.१७) करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये ज्ञानराज ऊर्फ मयूर नंदूजी भाेयर (२०), सचिन पांडुरंग नेहारे (२१), अंकित आनंदराव पाटील (२२), तेजस विनायक अतकरणे (२१) सर्व रा. इसापूर, ता. काटाेल व शुभम बंडूची राऊत (२१, रा. मन्नाथखेडी, ता. नरखेड) यांचा समावेश आहे. गेल्या दाेन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांनी पाेलीस ठाण्यात तक्रारी केल्या हाेत्या. मात्र या चाेरट्यांना पकडण्यात पाेलीस अपयशी ठरत हाेते. दरम्यान, नरखेड ठाण्याच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चाेरट्यांचा छडा लावला. माेटारपंप, पाईप व शेतीपयाेगी साहित्य लंपास करणाऱ्या टाेळीतील पाच आराेपींना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातून चाेरून नेलेले साहित्य जप्त करण्यात आले. यात ३१ हजार रुपये किमतीच्या पाच पानबुडी माेटारपंप, हाेस पाईप किंमत १,५०० रुपये, १,६०० रुपये किमतीचा २०० फूट केबल तसेच आराेपींनी गुन्ह्यात वापरलेली एमएच-३१/ईएक्स-१५२९ क्रमांकाची दुचाकी किंमत ६५ हजार रुपये असा एकूण ९९ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी सांगितले.
याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३७५ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काेलते, कैलास उईके, दिगांबर राठाेड, राजकुमार सातूर, नीतेश पुसाम यांच्या पथकाने केली.