शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

माऊली म्हणाले निवृत्तीनाथांना, मी समाधी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:12 AM

भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़़़ भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व्हावे, असा मानस मनाशी धरत ज्येष्ठ बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांना त्याची माहिती दिली आणि निवृत्तीनाथ जरा थबकलेच़़ संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन रंगवताना मालवण येथील हभप हरिहरबुवा नातू यांनी ज्ञानदेवांच्या कार्याची माहिती प्रतिपादित केली़

ठळक मुद्देहरिहरबुवा नातू यांनी गुंफले संजीवन समाधी कीर्तनराष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़  भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व्हावे, असा मानस मनाशी धरत ज्येष्ठ बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांना त्याची माहिती दिली आणि निवृत्तीनाथ जरा थबकलेच़़ संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन रंगवताना मालवण येथील हभप हरिहरबुवा नातू यांनी ज्ञानदेवांच्या कार्याची माहिती प्रतिपादित केली़राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने महाल, चिटणीस पार्क स्टेडियमवरील  मुकुंदराज महाराज साधू कीर्तन परिसरात आयोजित राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हरिहरबुवा नातू यांचे कीर्तन झाले़ प्रमुख पाहुणे म्हणून शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरूदास महाराज, साई मंदिर नागपूरचे संस्थापक विजयबाबा कोंड्रा, आ़ विकास कुंभारे, उद्योजक विलास काळे, भारत विकास परिषद विदर्भचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते़ रूपाली बक्षी यांनी गीत सादर केले़नातू म्हणाले़, मनातील देवाच्या अनुष्ठानासह अनुसंधान बांधण्याची गरज असून, ज्ञानेश्वरांनी २७ अभंगांचा हरिपाठ लिहिला आणि प्रत्येक अभंगात नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. परमेश्वराशी अनुसंधान जोडले तर कर्तव्यबुद्धी जागृत होते़ त्यातून कृतज्ञता भाव येतो आणि समर्पण वृत्ती वाढते़ समर्पण झाले की कृतार्थता येते़ याचे महत्त्व संतांनी सांगितले आहे. निवेदन स्मिता खनगई यांनी केले़ भगतबुवांना मृदंगमवर श्रीधर कोरडे, तबल्यावर हर्ष पायघन, संवादिनीवर धनराज यावलकर, सतारवर नासीर खान आणि व्हायोलिनवर शिरीष भालेराव यांनी साथसंगत केली.

 

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक