टाटा समूहाचा अहवाल :
एयर इंडिया तोट्यातून बाहेर निघू न शकल्याची दहा मोठी कारणे :
- एअर इंडिया बोईंग-७८७ ड्रीमलायनर विमानांसाठी सर्वाधिक भाडे चुकते करीत आहे.
- एअर इंडियाच्या एअरबस ए-३२०, बोईंग-७८७ सह सर्व विमानांच्या कॅबिनमध्ये सुधारणांची गरज आहे.
- छोट्या विमानांच्या बहुतांश विमानांच्या इंजिनच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे.
- कंपनीच्या ताफ्यातील बोईंग-७७७-२०० एलआर कार्यक्षम आणि उपयोगी ठरू शकले नाहीत.
- कंपनीमध्ये कॉर्पोरेट आणि प्रशासकीय स्तरावर जवळपास ४५०० ते ५००० अतिरिक्त कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्त्याच्या स्वरुपात जास्त रक्कम द्यावी लागत आहे.
- इंजिनिअरिंग आणि ग्राऊंड हॅण्डलिंगशी जुळलेल्या कंपन्यांसोबत महागडे आणि वित्तीय दबाव वाढविणारे करार केले आहेत.
- मोठ्या बोईंग विमानांबाबत अमेरिकन कंपनी जीईसोबत (जनरल इलेक्ट्रिक) महागडे करार केले आहेत.
- या महिन्यात प्रकाशित करण्यात आलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस क्रॅश अहवालाबाबत टाटा समूह चिंतित आहे.
- उपक्रमाच्या किंमतशी (गुंतवणूक) जुळलेल्या परिभाषेत लीजच्या बाध्यतेला सहभागी केलेले नाही.
- कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोफत तिकिटांचे वाटप केले आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम पडला आहे.