नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या डिसेंबरमध्ये बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची जाहीर सभा नागपुरात होणार आहे. यासाठी बसपाने वातावारण निर्मिती सुद्धा सुरु केली आहे. बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यासाठी नागपुरात तळ ठोकून बसणार आहेत.
मायावती यांची सभा ही निवडणुकीचे रणशिंग फुंकणारी असल्याने बसपा या सभेसाठी तयारीला लागली आहे. यासाठी आकाश आनंदहे स्वत: महाराष्ट्रात चार सभा घेणार आहेत. पहिली सभा ही येत्या १७ नोव्हेंबर रोजी नागपुरात होईल. २३ नोव्हेंबर रोजी दुसरी सभा पुणे २९ नोव्हेंबरला औरंगाबाद आणि ६ डिसेंबररोजी मुंबईला सभा होईल. सध्या मायावती या मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व तेलंगाना येथे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहेत. परंतु २०२४ च्या लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा नजरेसमोर ठेवून त्यांनी या सभांची आखणी केली आहे. आनंद आकाश यांच्या सभेच्या नियोजनासाठी स्थानिक बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली.
यात केंद्रीय समन्वयक नितीन सिंग, महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी व विदर्भाचे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे तसेच महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष एड संदीप ताजने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे नागोराव जयकर, नानाजी देवगडे, पृथ्वीराज शेंडे, विजयकुमार डहाट, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, जिल्हा प्रभारी एड राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष ओपुल तामगडे प्रामुख्याने उपस्थित होते.