शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मेयो : वेतनासाठी परिचारिकांचे पुन्हा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 8:21 PM

फेब्रुवारी महिन्याची सहा तारीख येऊनही वेतन न झाल्याने परिचारिकांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले. दुपारी ४ वाजतानंतर वेतन खात्यात जमा होताच परिचारिकांनी आंदोलन मागे घेतले. सहा तास चाललेल्या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली होती.

ठळक मुद्देसहा तासांच्या कामबंद आंदोलनानंतर मिळाले वेतन : रुग्णसेवा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिन्याचे वेतन पाच तारखेच्या आत होण्याच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) परिचारिकांनी कामबंद आंदोलन केले होते. आता फेब्रुवारी महिन्याची सहा तारीख येऊनही वेतन न झाल्याने परिचारिकांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले. दुपारी ४ वाजतानंतर वेतन खात्यात जमा होताच परिचारिकांनी आंदोलन मागे घेतले. सहा तास चाललेल्या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली होती.गेल्या दोन-अडीच वर्षांपासून मेयोच्या परिचारिकांचेच वेतन २५ तारखेनंतरच होते. या संदर्भात महाराष्ट्र गव्हर्न्मेंंट विदर्भ नर्सेस असोसिएशनने मेयो प्रशासनाला वारंवार कळविले. परंतु वेळेवर वेतन होत नसल्याची समस्या कायम होती. जानेवारी महिन्यात २९ तारीख येऊनही वेतन मिळाले नव्हते. यामुळे परिचारिकांनी सकाळी १०.३० वाजेपासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. आंदोलनात सहभागी परिचारिका कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांना भेटायला गेल्या असता ११ वाजूनही ९० टक्के लिपिक व वरिष्ठ अधिकारी हजर नव्हते. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी वेतनासाठी तातडीने हालचाली केल्या. यामुळे दोन तासांतच वेतन परिचारिकांच्या खात्यात जमा झाले. असोसिएशनतर्फे महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वेतन मिळण्याच्या मागणीचे निवदेन अधिष्ठात्यांना देण्यात आले. यामुळे फेब्रुवारी महिन्याचे वेतन वेळेवर होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सहा तारखेपर्यंत परिचारिकांचे वेतन न झाल्याने असोसिएशनच्या सरचिटणीस प्रभा भजन यांच्या नेतृत्वात १५०वर परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारले.असोसिएशन मेयोच्या कार्याध्यक्ष मीनाक्षी रामटेककर म्हणाल्या, वेळेवर वेतनाची समस्या परिचारिकांबाबतच का होते, याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपले काम चोख बजावल्यास महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळणे सहज शक्य आहे. परंतु दरवेळी कुठलेतरी कारण समोर करून उशीर केला जातो. वेतन उशिरा होत असल्याने अनेकांच्या कर्जाचे हफ्ते थकतात. यामुळे संबंधित बँका व्याज आकारत असल्याने आर्थिक फटका बसतो. या शिवाय, मागील वर्षीचा ‘टीडीएस’ अद्याप जमा झाला नाही. सातव्या वेतन आयोगाची अग्रिम राशी ४४ परिचारिकांना मिळालेली नाही. सर्व्हिस बुक पडताळणी झाली नाही. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या परिचारिकांना पेन्शन नाही. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठीही हे कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. रुग्णसेवेला फटका बसू नये म्हणून प्रत्येक वॉर्डातील दोनपैकी एक परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, असेही त्या म्हणाल्या.वेतन न झाल्यास दर ५ तारखेला आंदोलन१ किंवा २ तारखेपर्यंत वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन पुन्हा एकदा अधिष्ठात्यांना देण्यात आले आहे. पुढील महिन्यापासून या तारखेला वेतन न झाल्यास दर ५ तारखेला कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.मीनाक्षी रामटेककरकार्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशन, मेयो

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)agitationआंदोलन