शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मेयोतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे; सफाई कामे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 10:36 PM

दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयातील (मेयो) २०० वर सफाई कर्मचारी गुरुवार सकाळपासून संपावर गेले होते. मेयोेचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी स्थानिक कोषातून निधी देण्याची तयारी दर्शविल्याने रात्री ८ वाजताच्या सुमारास संप मागे घेण्यात आला.

ठळक मुद्दे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयातील (मेयो) २०० वर सफाई कर्मचारी गुरुवार सकाळपासून संपावर गेले होते. कोरोना पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाने सफाईची कामे प्रभावित झाली होती. संपाची महिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना मिळताच त्यांनी यात पुढाकार घेतला, तर मेयोेचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी स्थानिक कोषातून निधी देण्याची तयारी दर्शविल्याने रात्री ८ वाजताच्या सुमारास संप मागे घेण्यात आला.मेयोत सफाई कर्मचाऱ्यांची ३२१ पैकी १२४ पदे रिक्त आहेत. रुग्णालयाच्या वाढत्या विभागांमुळे कर्मचारी कमी पडतात. यामुळे शासनाने सफाई कामाचे आऊटसोर्सिंग करीत ‘बीव्हीजी’ या खासगी कंपनीला कंत्राट दिले. २०० कर्मचाऱ्यांच्या ताफ्यामुळे मेयोच्या स्वच्छतेत भर पडली. या कंपनीला दरमहा ४५ लाख रुपये मेयोला द्यावे लागतात. परंतु गेल्या वर्षी शासनाकडून ६० टक्केच निधी मिळाल्याने व उर्वरित निधीसाठी शासनाकडे पुरवणी मागणी करूनही तो मिळाला नाही. परिणामी, चार महिन्यांचे वेतन थकले. विशेष म्हणजे, अशा प्रसंगी संबंधित कंपनीकडून तीन महिन्यांचे वेतन देण्याचा नियम आहे. त्यानुसार कंपनीने दोन महिन्यांचे वेतन दिल्याचे समजते. उर्वरित दोन महिन्यांच्या वेतनासाठी कर्मचारी आजपासून आंदोलनाला बसले.कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णालय अडचणीत आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मते, ‘लॉकडाऊन’ असल्याने घरातील कमावत्या व्यक्तीच्या हाताला काम नाही. आम्हाला दोन महिन्यापासून वेतन नाही. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे नाईलाजाने कामबंद आंदोलन करावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. संपामुळे रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी मेयोच्या स्थानिक कोषातून दोन महिन्याचे वेतन देण्याची तयारी दर्शवली. संपाची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांना मिळताच त्यांनी यात पुढाकार घेऊन कोषागार विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी संप मागे घेतला.

-स्थानिक कोषातून वेतन देणारनिधीअभावी सफाई कंपनीचे बिल थकले आहे. याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. स्थानिक कोषातून त्यांना वेतन दिले जाणार आहे. सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होणार असल्याने त्यांनी रात्री संप मागे घेतला.-डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल