लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ५० हून अधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच उपाययोजनांना सुरुवात झाली. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची तपासणी केली असता कूलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. या विभागाच्यावतीने कोल्ड फॉगिंग व कीटकनाशक फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे.उपराजधानीत डेंग्यूचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. सध्या रुग्णांची संख्या २५०वर गेली आहे. एकट्या मेयोमध्ये डेंग्यूचे ६०वर रुग्ण उपचार घेत आहे. परंतु याच रुग्णालयात डेंग्यूच्या डासांचा प्रकोप झाल्याने रुग्णांसोबतच डॉक्टरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सूत्रानूसार, सध्या ५०वर निवासी डॉक्टर व विद्यार्थी डेंग्यूवर उपचार घेत आहेत. याची दखल आरोग्य विभागाने घेतली. मंगळवारी मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली असता कूलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. तातडीने कूलरचे पाणी फेकून कीटकनाशक फवारणी करण्यात आली. विभागाच्यावतीने प्रत्येक खोलीमध्ये जाऊन कोल्ड फॉगिंगही करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, वसतिगृहातील बहुसंख्य कूलर्स खिडक्यांवर लावण्यात आले आहे. तिथे पोहचणे कठीण असले तरी पाण्यात डासांच्या अळ्या दिसून येतात. यामुळे हे कूलर काढणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल.मेडिकलमध्ये १५ रुग्णमेडिकलच्या बालरोग विभागात विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खाटा कमी पडू लागलेल्या आहेत. यात सर्वात जास्त डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. बालरोग विभागात सुमारे १५ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.
मेयो : वसतिगृहात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:52 AM
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ५० हून अधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच उपाययोजनांना सुरुवात झाली. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची तपासणी केली असता कूलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. या विभागाच्यावतीने कोल्ड फॉगिंग व कीटकनाशक फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे मनपाने केली कीटकनाशकाची फवारणी