लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक व रुग्णाच्या नातेवाईकामधील संघर्ष समोर आला आहे. सोमवारी सायंकाळी एका रुग्णाच्या नातेवाईकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याने खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक जबाबदारी विसरून स्वत:ला पोलीस समजत असल्याने मेयो प्रशासन वेळोवेळी अडचणीत येत आहे.प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी मेयोच्या प्रसूती वॉर्डात नातेवाईकाला जेवणाचा डबा पोहचविण्यासाठी मो. कय्यूम मो. अयूब एका लहान मुलासोबत गेला. यावेळी वॉर्डाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाने त्याला थांबविले. मुलाला सोबत घेऊन जाता येणार नाही, असे सांगितले. यावर कय्यूम नाराज झाला. सुरक्षा रक्षक व कय्यमूमध्ये वाद निर्माण झाला. रक्षकाने कायदा हाती घेत त्याला थापड मारली. या प्रसंगामुळे लहान मुलगा घाबरला. कय्यूमच्या नातेवाईकानुसार, सुरक्षा रक्षकाने कय्यूमला एका खोलीत नेऊन चांगलीच मारहाण केली. या प्रकरणाला नातेवाईकांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मेयो रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:55 PM
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक व रुग्णाच्या नातेवाईकामधील संघर्ष समोर आला आहे. सोमवारी सायंकाळी एका रुग्णाच्या नातेवाईकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याने खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक जबाबदारी विसरून स्वत:ला पोलीस समजत असल्याने मेयो प्रशासन वेळोवेळी अडचणीत येत आहे.
ठळक मुद्देसुरक्षा रक्षकाने हाती घेतला कायदा