लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सुभाष व जवाहर मुलांच्या वसतिगृहातील तळमजल्याच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामुळे शंभरावर असलेल्या इंटर्न, बीपीएमटीच्या विद्यार्थ्यांना जावे कुठे हा प्रश्न पडला. काही विद्यार्थी नवीन वसतिगृहात शिरले, परंतु तेथील विद्यार्थ्यांनी हे वसतिगृह सोडण्यास भाग पाडले. परिणामी, काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सुभाष व जवाहर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाण्यात रात्र काढावी लागल्याचे समजते.मेयोमधील सुभाष व जवाहर मुलांचे वसतिगृह मोडकळीस आले आहे. मात्र ‘इंटर्न’, ‘बीपीएमटी’, ‘जेआर वन’ व इतरही विद्यार्थ्यांना या दोन्ही वसतिगृहात ठेवले जाते. शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी दोन्ही वसतिगृहाच्या तळमजल्यावरील विद्यार्थ्यांच्या खोल्यात शिरले. अनेकांचे सामान ओले झाले. यामुळे काही विद्यार्थ्यांनी नुकतेच नव्याने बांधकाम झालेल्या वसतिगृहात आश्रय घेतला. परंतु तेथील विद्यार्थ्यांनी हिसकावून लावले. यामुळे विद्यार्थ्यांना खोल्यांमध्ये साचलेल्या पाण्यात रात्र काढावी लागली. काही विद्यार्थ्यांनी सांगितले, ही घटना घडूनही अधिष्ठात्यांनी येऊनही पाहिले नाही किंवा उपाययोजना केल्या नाहीत. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना विद्यार्थ्यांचे पाण्यातले फोटोसह एक निवेदन सोमवारी दिले जाणार असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.रुग्णही भिजलेमेयोचा बालरुग्ण विभाग हा आजही जुन्या इमारतीत आहे. या भिंतीतून पावसाचे पाणी आत शिरते. यामुळे दरवर्षी मुसळधार पावसात रुग्ण भिजतात. अशीच स्थिती स्त्री रोग व प्रसूती रोग विभागाची आहे. परंतु कुणीच याकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मेयो रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांची रात्र पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 8:47 PM
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सुभाष व जवाहर मुलांच्या वसतिगृहातील तळमजल्याच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामुळे शंभरावर असलेल्या इंटर्न, बीपीएमटीच्या विद्यार्थ्यांना जावे कुठे हा प्रश्न पडला. काही विद्यार्थी नवीन वसतिगृहात शिरले, परंतु तेथील विद्यार्थ्यांनी हे वसतिगृह सोडण्यास भाग पाडले. परिणामी, काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सुभाष व जवाहर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाण्यात रात्र काढावी लागल्याचे समजते.
ठळक मुद्देबालरोग, स्त्रीरोग विभागातही शिरले पावसाचे पाणी