शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मेयो रुग्णालयात लागणार ट्रूनॅट यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:14 AM

मेयो रुग्णालय हे कटेन्मेंट झोनच्या फार जवळ आहे. परिणामी, या भागातून सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात येतात. अनेक संशयित रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे अशा रुग्णांचे किंवा संशयित मृतदेहाचे तातडीने नमुने तपासणे गरजेचे ठरते. यासाठी मेयो प्रशासनाने आरोग्य विभागाकडे ट्रूनॅट यंत्राची मागणी केली असून मंजुरीही मिळाली आहे.

ठळक मुद्देसंशयित रुग्ण व मृतदेहाचे तातडीने तपासले जाणार नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयो रुग्णालय हे कटेन्मेंट झोनच्या फार जवळ आहे. परिणामी, या भागातून सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात येतात. अनेक संशयित रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे अशा रुग्णांचे किंवा संशयित मृतदेहाचे तातडीने नमुने तपासणे गरजेचे ठरते. यासाठी मेयो प्रशासनाने आरोग्य विभागाकडे ट्रूनॅट यंत्राची मागणी केली असून मंजुरीही मिळाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. विशेषत: मोमिनपुरा, सतरंजीपुरा, टिमकी या भागात आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. येथील रुग्णांना मेयो जवळ पडत असल्याने कधीही रुग्ण उपचारासाठी येतात. विशेषत: अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणाऱ्यांना पीपीई किट दिली असली तरी त्यानंतर तो रुग्ण इतर वॉर्डात जात असल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता असते. रविवारी मृत्यू झालेल्या ५८ वर्षीय संशयित महिलेच्या बाबतीत असेच झाले. या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवल्यानंतर तिचा मृत्यू झाला. आज नमुना पॉझिटिव्ह आल्याने तिच्या संपर्कात आलेले डॉक्टर, परिचारिका व अटेन्डंटला क्वारंटाइन व्हावे लागले. यापूर्वीही असाच प्रकार झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन असे प्रकरण वाढणार आहेत. यामुळे संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्यासाठी मेयो प्रशासनाने आरोग्य विभााकडे ट्रूनॅट यंत्राची मागणी केली. या यंत्रामुळे तासाभरात चाचणीचा अहवाल मिळतो. यामुळे रुग्णावर उपचार करणे सोपे होणार आहे.सीबी नॅट यंत्राचीही मागणीसंशयित रुग्णांची तातडीने चाचणी करण्यासाठी ट्रूनॅट यंत्राची मदत घेतली जाणार आहे. लवकरच हे यंत्र मेयोत स्थापन होईल. या यंत्रासोबत सीबी नॅट यंत्राची मागणी उपसंचालक आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.-डॉ. रवी चव्हाणउपसंचालक, आरोग्य विभाग

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)