नागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी १९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या दरम्यान निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाºयांपैकी जर कुणाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर मेयो, मेडिकलसह खासगी हॉस्पिटलला ‘अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात ४ बेड राखीव असणार आहेत.
उपराजधानीत पुन्हा एकदा उन्ह तापायला लागले आहे. मागील तीन दिवसांत २७ अंशावर आलेले तापमान सोमवारी ३७ अंशावर पोेहचले. उन्हाची स्थिती लक्षता घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. निवडणूक कामानिमित्त कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचाºयाला दुर्दैवाने काही गंभीर आरोग्याची समस्या निर्माण झाली तर जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा मिळणार आहे. त्या दृष्टीने समन्वय साधण्याचा सूचना मनपा व आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. सोमवारी प्रशासनाने मेडिकलचा अतिदक्षता विभागात ४ बेड राखीव ठेवण्याचाही सूचना देण्यात आल्या. त्या दृष्टीने मेडिकलने तयारी केली आहे. याला वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दुजोरा दिला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) अद्याप अशा सूचना नाहीत. परंतु रुग्णालय प्रशासनाने आपल्यास्तरावर नियोजन केल्याची माहिती आहे.
मतदान केंद्रावर ‘फर्स्ट अॅड बॉक्स’वाढते तापमान लक्षात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर आपात्कालिन स्थितीत प्रयोगात आणणाºया औषधींसाठी ‘फर्स्ट अॅड बॉक्स’ उपलब्ध असणार आहे. यात सुमारे ३५००वर मेडिसीन किट उपलब्ध असतील. ‘ओआरएस’ व ग्लुकोज पावडर सुद्धा उपलब्ध असेल. मनपाने शहर केंद्रासाठी २१०० तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून १५०० या किट्स उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आहे.