लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन तासानंतरही एका लोकप्रतिनिधीच्या मुलाला उपचार मिळाला नाही. याची गंभीर दखल मेयो प्रशासनाने घेत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तीन ‘कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर’वर (सीएमओ) कठोर कारवाई करीत त्यांची सेवा समाप्त केली तर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या शल्यक्रिया विभागाच्या तीन निवासी डॉक्टर व तीन नर्स व एका ब्रदरला त्यांच्या विभाग प्रमुखांकडून नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या.‘लोकमत’ने १३ ऑगस्टच्या अंकात ‘मध्यरात्री डॉक्टर करतात तरी काय?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून मेयो रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आणला. या वृत्ताने खळबळ उडाली. विशेष म्हणजे प्रथमच मेयो प्रशासनाने कठोर भूमिक घेत कारवाई केली.गांधीबाग परिसरातील ज्येष्ठ नगरसेवकाच्या मुलाची प्रकृती रविवारी मध्यरात्रीनंतर अचानक खालवली. तातडीने मेयो रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल केले. या विभागाची जबाबदारी असलेल्या ‘सीएमओ’ने वरवार पाहून विभागाच्या वॉर्डात घेऊन जाण्यास सांगितले. यावेळी तीन ‘सीएमओ’ होते. वॉर्डात शल्यक्रिया विभागाचे तीन व औषध वैद्यकशास्त्र विभागाचा एक असे चार निवासी डॉक्टर उपस्थित होते. परंतु यातील एकानेही रुग्णाला तपासले नाही. वॉर्डात तीन नर्स व एक ब्रदर्सची ड्युटी होती. यातील एका नर्सने सलाईन लावण्यासाठी ‘कॅथेटर’ लावले. परंतु पुढील दोन तास ना सलाईन लागली ना उपचार झाले. उपचारात उशीर होत असल्याने व मुलाची प्रकृती बिघडत असल्याचे पाहत लोकप्रतिनिधीने खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी नर्सल कॅथेटर काढण्याची विनंती केली. परंतु नर्सने रुग्णाजवळ न जाता त्याला आपल्याकडे बोलावून उभ्या-उभ्या कॅथेटर काढले. यामुळे हातातून रक्त बाहेर आले. रक्त पाहून मुलगा चक्कर येऊन खाली कोसळला. लोकप्रतिनिधीने याबात जाब विचारला. त्यावेळी ज्याची ड्युटी नव्हती अशा शल्यचिकित्सा विभागातील ‘जेआर तीन’च्या निवासी डॉक्टरांनी लोकप्रतिनिधीशी वाद घातला. हे प्रकरण ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध करताच मेयो प्रशासनाने याची चौकशी केली.सीसीटीव्ही फुटेजमधून वास्तव समोर आलेलोकप्रतिनिधीच्या तक्रारीवरून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात तीन ‘सीएमओ’, चार निवासी डॉक्टर, तीन नर्स व एक ब्रदरने उपचारात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले. मंगळवारी मेयो प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तिनही ‘सीएमओ’ची सेवा समाप्त केली. सोबतच निवासी डॉक्टर व नर्सला नोटीस देण्याची सूचना त्यांच्या विभाग प्रमुखांना दिल्या.डॉ. सागर पांडेप्रभारी, वैद्यकीय अधीक्षक मेयो
मेयोत लोकप्रतिनिधीच्या मुलाच्या उपचारात हयगय प्रकरण : तीन डॉक्टरांची सेवा समाप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 9:49 PM
दोन तासानंतरही एका लोकप्रतिनिधीच्या मुलाला उपचार मिळाला नाही. याची गंभीर दखल मेयो प्रशासनाने घेत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तीन ‘कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर’वर (सीएमओ) कठोर कारवाई करीत त्यांची सेवा समाप्त केली.
ठळक मुद्देलोकमत इम्पॅक्ट : चार निवासी डॉक्टर व तीन नर्सला नोटीस