शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

मेयो : तब्बल २१ व्या दिवशी नमुने निगेटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 9:22 PM

कोरोनामुक्त होऊन गुरुवारी मेयो रुग्णालयातून घरी गेलेल्या ४४ व्यक्तीचे नमुने सलग चार वेळा पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पहिल्यांदाच घडले.

ठळक मुद्दे आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुक्त होऊन गुरुवारी मेयो रुग्णालयातून घरी गेलेल्या ४४ व्यक्तीचे नमुने सलग चार वेळा पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पहिल्यांदाच घडले. परंतु डॉक्टरांच्या चमूने हार मानली नाही. मल्टीव्हिटॅमिन सुरू केले. रुग्णांकडून प्रतिसाद मिळाला आणि तब्बल २१ व्या दिवशी नमुने निगेटिव्ह आले. या घटनेने डॉक्टरांचे मनोबल उंचावले. रुग्णालयातून घरी जाताना रुग्णाच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता. एम्प्रेस सिटी येथील रहिवासी असलेला हा रुग्ण दिल्ली येथील प्रवासावरून नागपुरात आला. दोन आठवडे घरीच होता. ताप, खोकला ही लक्षणे असल्याने तपासणीसाठी मेयोत आला. येथील डॉक्टरांनी त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. हा रुग्ण ज्या रेल्वेतून नागपुरात आला त्याच रेल्वेत खामल्यातील पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे समोर आले. त्यांनी कोरोना संशयित म्हणून तातडीने रुग्णाला दाखल केले. २९ मार्च रोजी नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औषधोपचाराला सुरुवात झाली. परंतु १०, १४ व १८ एप्रिल रोजी नमुने तपासले असता तिन्ही नमुने पॉझिटिव्ह आले. औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते, डॉ. राखी जोशी, डॉ. मृणाल हरदास व डॉ. पांढरीपांडे यांनी याचा बारकाईने अभ्यास केला. औषधोपचारात मल्टीव्हिटॅमिनचा डोज वाढविला. रुग्णानेही स्वत:कडून योग व आयुर्वेदिक औषधोपचार सुरू केला. आणि २१ दिवशी २४ तासाच्या अंतराने घेतलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. डॉक्टरांच्या या कार्याचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याह डॉ. रवी चव्हाण, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी कौतुक केले. बाधित रुग्णानेही सर्व डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांच्या कार्याची स्तुती करीत आभार मानले. मेयो रुग्णालयातून बरा झालेला हा सातव रुग्ण होता. नागपुरातील बाधित ९८ रुग्णांमधून आतापर्यंत १५ रुग्ण बरे झाले आहेत.२ मुली २२ दिवसानंतरही पॉझिटिव्हया रुग्णासोबतच २८ व २९ मार्च रोजी १२ व १७ वर्षाची मुलगी कोरोनाबधित असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही युवतीचे नमुने ७ व्या दिवशी, १४ व्या दिवशी व १८ व्या दिवशी तपासले असता पॉझिटव्ह आले आहेत. शुक्रवारी पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. विशेष म्हणजे, यांचे वडिलांचे नमुने १४ व्या दिवशी निगेटिव्ह आले. परंतु मुलींना रुग्णालयात कसे एकटे सोडणार या विचाराने ते रुग्णालयातून घरी गेले नाही.अन्यथा अनर्थ झाला असता२८ मार्चच्या पूूर्वीपर्यंत केवळ परदेशातून आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासा असे आदेश होते. मात्र, या रुग्णाकडून जी माहिती काढून घेतली आणि त्याचवेळी जो निर्णय घेतला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर या रुग्णाला घरी पाठविले असते तर आज बाधित रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली असती.

-डॉ. सागर पांडे उपवैद्यकीय अधीक्षक, मेयो