शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मेयो :  एका परिचारिकेवर ४० रुग्णांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:54 PM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मेयो प्रशासन ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’सारखे नवे विभाग निर्माण करीत आहे. खाटांची संख्या ५९० वरून ८३३ वर गेली आहे. परंतु त्या तुलनेत परिचारिकांची पदे निर्माण करण्यात आली नाहीत. सध्या रुग्णालयात परिचारिकांची ४७५ पदे मंजूर आहेत. यातील साधारण ३० टक्के सुट्यांवर असल्याने एका परिचारिकेवर सुमारे ४० रुग्णांचा भार पडला आहे. तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे आदर्श प्रमाण मागे पडले आहे.

ठळक मुद्देखाटा ८३३, परिचारिका ४७५ : कामाचा वाढला ताण

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मेयो प्रशासन ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’सारखे नवे विभाग निर्माण करीत आहे. खाटांची संख्या ५९० वरून ८३३ वर गेली आहे. परंतु त्या तुलनेत परिचारिकांची पदे निर्माण करण्यात आली नाहीत. सध्या रुग्णालयात परिचारिकांची ४७५ पदे मंजूर आहेत. यातील साधारण ३० टक्के सुट्यांवर असल्याने एका परिचारिकेवर सुमारे ४० रुग्णांचा भार पडला आहे. तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे आदर्श प्रमाण मागे पडले आहे.परिचारिका आरोग्य सेवेचा कणा आहे. विशेषत: रु ग्ण, रु ग्णांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर यांच्यातील परिचारिका हा एक मोठा दुवा आहे. रुग्णाला औषध देण्यासोबतच आपुलकीचे नाते परिचारिकेमुळे जुळते. रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालते. परंतु शासनाचे या परिचारिकांकडेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. मेयोमध्ये पूर्वी खाटांची संख्या ५९० व परिचारिकांची संख्या ४७५ एवढी होती. यामुळे रुग्णसेवेचा फारसा ताण नव्हता. परंतु गेल्या तीन वर्षांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या १५०० वरून अडीच ते तीन हजारावर गेली आहे. यातच एप्रिल २०१७ पासून ‘सर्जिकल्स कॉम्प्लेक्स’ रुग्णसेवेत रुजू झाले. मेयोच्या जुन्या ५९० खाटांमध्ये वाढीव २५० खाटांची भर पडली. अस्थिरोग, ईएनटी, नेत्र, व शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया कक्षासोबतच वॉर्डही उपलब्ध करून देण्यात आले. वाढीव खाटांमुळे जमिनीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना खाट मिळाली. मात्र, जुन्या खाटांच्या तुलनेत मंजूर पदांमधील परिचारिकांची ७३ पदे, चतुर्थ कर्मचाऱयांची २०० पदे, फार्मसिस्टची सहा पदे , तंत्रज्ञची पाच पदे याशिवाय इतरही रिक्त पदांकडे दुर्लक्ष झाले. या जागा न भरताच नव्याने २५० नव्या खाटांचा भार पडल्याने सर्वांवरच कामाचा ताण पडला आहे. याची माहिती मेयो प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) दिली. नव्या खाटांना मंजुरी देऊन त्या दृष्टीने वाढीव पदांची मागणी केली. परंतु ‘डीएमईआर’कडून अद्यापही उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. कामाच्या ताणामुळे परिचारिकांचे सुट्यांवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना अटेंडंटसह अनेकवेळा परिचारीकेचेही काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. सध्या ३० ते ४० खाटांच्या वॉर्डात एक परिचारिका रुग्णसेवा देत आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Healthआरोग्य