शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

महापौरांचा संकल्प : नागपुरात वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:08 PM

मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असून दहशतीत असल्याने या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक मोहीम राबवून वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात १२ कोटींची तरतूद करणार : सिमेंट रस्ते कमी करू पण नसबंदी करू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात सुमारे ९० हजार मोकाट कुत्री आहेत. यातील १० हजार कुत्र्यांवर नसबंदी झालेली आहे. याला वेळीच आळा घातला नाही तर पुढील वर्षात मोकाट कु त्र्यांची संख्या दीड लाखावर जाईल. मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असून दहशतीत असल्याने या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक मोहीम राबवून वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे.महापालिका पुढील वित्त वर्षात अर्थात एप्रिल २०२० पासून शहरात नसबंदी मोहीम हाती घेणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १२ कोटींची तरतूद केली जाईल. एका नसबंदीवर १ हजार रुपये खर्च होईल. यासाठी नागपूरह राज्यातील सेवाभावी संस्थांना निमंत्रित करण्यात आले आहे. दररोज २०० नसबंदीचे उद्दिष्ट ठेण्यात आल्याची माहिती महापौरसंदीप जोशी यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.एकवेळ सिमेंट रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला नाही तरी चालेल. परंतु कुत्र्यांवरील नसबंदीसाठी निधीची कमतरता भासणार नाही. मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यासाठी सर्वोंच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसारच आवश्यक उपाययोजना क रण्यात येतील. सध्या महापालिका एका नसबंदीवर ८०० रुपये खर्च करते. परंतु ही रक्कम कमी आहे. त्यामुळे १ हजार रुपये खर्च गृहीत धरण्यात आला असून त्यानुसार तरतूद केली जाणार आहे. दररोज २०० नसबंदी केल्या तर एका महिन्यात ६ हजार शस्त्रक्रिया होतील. वर्षभरात ७२ हजार शस्त्रक्रिया होईल. यातून कु त्र्यांच्या संख्येला आळा बसेल.कचरा आढळल्यास भूखंड ताब्यात घेणारमोकळया भूखंडावर कचरा टाकला जातो. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. नोटीस बजावल्यानंतरही कचरा टाकला जात असेल तर असे भूखंड महापालिका नियमानुसार आपल्या कब्जात घेऊ शकते. खामला ते त्रिमूर्ती नगर यादरम्यानच्या मार्गावर ४ एकर भूखंडावर कचरा साचून आहे. हा भूखंड महापालिका आपल्या कब्जात घेणार आहे. त्यानंतर शहरातील कचरा असलेले अन्य भूखंड ताब्यात घेणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.५ कोटी खर्चून ३२ शौचालय उभारणारशहरात विविध भागात महापौर निधीतून ५ कोटी खर्च करून ३२ सुलभ शौचालयांचे बांधकाम केले जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली. महापालिकेच्या भंगार बसचा ‘ती’शौचालयासाठी वापर केला जाणार आहे. सुरुवातीला प्रायोगित तत्त्वावर दोन बसचा यासाठी वापर केला जाणार आहे.ट्रॅव्हल्स बससाठी शहराबाहेर सहा पॉईंटट्रॅव्हल्स बसेसमुळे शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. रहदारीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता महापालिका सभागृहात प्रस्ताव पारित करून शहरातील ट्रॅव्हल्स बसेस शहराबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात दटके समितीच्या अहवालानुसार निर्णय घेतला जाईल. शहराबाहेर सहा पॉईंट निर्माण केले जातील. येथे प्रवाशांना शहरात येण्यााठी शहर बस सुविधा उपलब्ध करणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.९ जानेवारीला खाऊ गल्लीचे उद्घाटनगांधीसागर तलावाच्या बाजुने खाऊ गल्ली उभारण्यात आली आहे. बांधकाम पूर्ण झाले आहे. येथे ३२ स्टॉल असून यासाठी ७८अर्ज आले आहेत. त्यामुळे लकी ड्रॉ काढून स्टॉलचे वाटप केले जाणार आहे. सायंकाळी ६ ते ११ दरम्यान रमण विज्ञान केंद्रासमोरील रस्ता बंद ठेवण्याची मागणी केली जात आहे. यावर सभागृहात निर्णय घेतला जाईल. ९ जानेवारीला खाऊ गल्लीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.बाजारात रात्रीलाही एनडीएसचा पहाराउपद्रव शोध पथक गठित केल्यापासून शहरातील प्लास्टिक वापराला आळा बसण्याला मदत झाली आहे. पथकातील ८७ जवानांनी वर्षभरात २.७५ कोटींचा दंड वसूल केला. आता पुन्हा ११४ माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील ५० जवान सायंकाळी ४ ते रात्री १२ पर्यंत शहरातील प्रमुख आठवडी बाजारात गस्त घालतील. प्रत्येक झोनसाठी ५ जवान नियुक्त केले जातील. अशी माहिती जोशी यांनी दिली.

 

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरnagpurनागपूरMediaमाध्यमे