शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

ट्रेडिंगचा भुलभुलय्या: यूपी, बंगालमधून घेतले जातात ‘सीमकार्ड्स’ तर भाड्याने घेतली जातात बँक खाती

By योगेश पांडे | Published: May 21, 2024 12:11 AM

Nagpur: ‘प्रोफेसर गॅंग’कडून प्रामुख्याने व्हॉट्सअप व टेलिग्रामच्या माध्यमातून हा शेकडो कोटींचा गोरखधंदा चालतो. यासाठी लागणारी बहुतांश सीम कार्ड्स उत्तर प्रदेश व बंगालसारख्या राज्यांमधून मिळविण्यात येतात. विशेषत: गरीब किंवा निरक्षर नागरिकांची कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावावरदेखील सीमकार्ड्स घेण्याचे प्रकार वाढले आहेत.

- योगेश पांडे  नागपूर : ‘प्रोफेसर गॅंग’कडून प्रामुख्याने व्हॉट्सअप व टेलिग्रामच्या माध्यमातून हा शेकडो कोटींचा गोरखधंदा चालतो. यासाठी लागणारी बहुतांश सीम कार्ड्स उत्तर प्रदेश व बंगालसारख्या राज्यांमधून मिळविण्यात येतात. विशेषत: गरीब किंवा निरक्षर नागरिकांची कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावावरदेखील सीमकार्ड्स घेण्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय बॅंकेतील पैसे फिरविण्यासाठी वापरण्यात येणारी शेकडो बॅंक खाती तर चक्क भाड्याने घेतली जातात.

‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रवेश मिळविलेल्या ‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहाहून अधिक ॲडमिन्स होते. त्यात तथाकथित आर्यन रेड्डी, देविका शर्मा यांचादेखील समावेश होता. मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश या राज्यांमधील होते. टोळीतील अनेक सदस्यांचे मोबाईल क्रमांक उत्तरप्रदेशमधीलच असल्याची बाब समोर आली. ‘लोकमत’शी संपर्क केलेल्या पिडीत गुंतवणूकदारांनी ज्यावेळी पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा हे सर्व मोबाईल क्रमांक स्वीच ऑफ असल्याचे निघाले. झेरॉक्स दुकानदारांशी संगमनत करून या टोळीचे सदस्य कागदपत्रे मिळवतात व त्याच्या आधारावर सीम कार्ड्स विकत घेण्यात येतात. त्या माध्यमातून हे पूर्ण रॅकेट संचालित करण्यात येते.

तंत्रज्ञानाचा असादेखील उपयोग, मोबाईल स्वीचऑफ - व्हॉट्सअप मात्र सुरूआरोपींकडून व्हॉट्सअपमधील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. विविध लॅपटॉप्स व संगणकावर व्हॉट्सअप वेबच्या माध्यमातून व्हॉट्सअप सुरू करण्यात येते. ओटीपी सीम कार्डच्या मोबाईलवर आल्यानंतर काही वेळाने सीम कार्ड मोबाईलमधून बाहेर काढण्यात येते. त्यानंतर केवळ लॅपटॉप-संगणकाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यात येतो. आरोपी एकाच मोबाईलमध्ये शेकडो सीमकार्ड्स संचालित करून हे रॅकेट चालवतात.

टोळीत उच्चशिक्षितांचादेखील समावेशया गॅंगमध्ये सुरुवातीला शेअर मार्केटचे अद्ययावत ज्ञान देण्यात येते व कुठल्या शेअरचे भाव वधारेल हेदेखील अचूकपणे सांगण्यात येते. यासाठी वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले मात्र गुन्हेगारी वृत्ती असलेल्यांची मदत घेण्यात येते. याशिवाय तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असलेले आरोपीदेखील टोळीत असतात. काही आरोपी देशाच्या बाहेर बसून टोळीचे रॅकेट संचालित करतात. ‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’ या व्हॉट्सॲपमधील दोन सदस्य युनायटेड किंगडम व दुबईतील होते. त्यांच्या मोबाईल क्रमाकांसमोर त्या देशांचा कोड होता. या देशांसोबतच अशा टोळ्यांचे सदस्य नेपाळ व इतर देशांतूनदेखील रॅकेट संचालित करतात.

५० हजार ते दीड लाखात बॅंक खातेप्रोसेसर गॅंगकडून शेकडो बॅंक खाती संचालित करण्यात येत असल्याची बाब लोकमतने उघडकीस आणली होती. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक खाती भाड्याने घेण्यात येतात. जयपूरमधील एका गुन्ह्यात तर दोन आरोपींनी ५०-५० हजारांत बॅंक खाती सायबर गुन्हेगारांना सोपविली होती. त्यातून पिडीतांकडून उकळलेले पैसे इकडून तिकडे करण्याचा प्रकार सुरू होता. यात काही खाजगी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांचीदेखील मदत घेण्यात येते. जयपूरमधील प्रकरणात तर बॅंक कर्मचाऱ्यालादेखील अटक करण्यात आली आहे.

बॅंक खातेदारांना माहिती नाहीगॅंगचे सदस्य ग्रामीण भागातील गरीब लोकांना गाठून त्यांचे बॅंक खाते उघडून घेतात व त्या बदल्यात त्यांना दरमहा काही पैसे देण्याचे आमिष दाखवितात. पासबुक व बॅंकेचे सर्व दस्तावेज गॅंगच्या एजंट्सकडे असतात. त्यातून दररोज लाखो-कोट्यावधी वळविले जातात. मात्र मूळ बॅंक खातेदाराला याची माहितीच नसते. ‘लोकमत’ने या बॅंक खात्याची माहिती काढली असता केरळ, राजस्थान, महाराष्ट्रातील पुणे अशा विविध ठिकाणच्या बॅंक खात्यात गुंतवणूकदारांचे पैसे वळविल्याची बाब समोर आली.

मुंबईतील पत्ता बोगसनामांकित ‘एमएनसी’च्या नावाने ‘प्रोफेसर गॅंग’ने सुरू केलेल्या ॲपच्या तपशीलांमध्ये पत्ता हा मुंबईतील बीकेसी येथील देण्यात आला होता. प्रत्यक्षात त्या पत्त्यावर कुठलीही फर्म नव्हती. सर्वसाधारणत: गुंतवणूकदार ॲपमधील तपशील पाहत नाहीत. जर कुणी तपशील पाहिलाच तर त्यांच्या समाधानासाठी बीकेसीचा पत्ता देण्यात आला होता. प्रत्यक्षात नमूद केलेले कॉल सेंटर व पत्ता हे सर्व बोगस होते.(पुढील भागात : ‘प्रोफेसर गॅंग’ म्हणजे हिमनगाचे टोक, काम एक-नाव अनेक...शेकडो टोळ्यांची नजर भारतीयांच्या पैशांवर)

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर