लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माया गँगचा सूत्रधार सुमित चिंतलवार आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध नंदनवन पोलिसांनी मकोका लावला असून तहसिल पोलिसांनी कुख्यात दानिश अहमदसह तीन गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे.सुमितच्या विरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा, हप्ता वसुलीसह २१ गुन्हे दाखल आहेत. दक्षिण नागपुरात त्याची दहशत आहे. माया गँगचा सूत्रधार असल्यामुळे त्याने पडद्याआड अनेक खून केले आहेत. या गँगमध्ये अजनी परिसरातील अनेक कुख्यात गुन्हेगार आहेत. यात अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. त्यांना पुढे करून सुमितने गुन्हेगारी जगतात आपला दबदबा निर्माण केला आहे. सुमितने १६ डिसेंबर २०१८ रोजी साथीदारांच्या मदतीने नंदनवनमध्ये अर्जुन चिट्टीयारचे अपहरण केले होते. तो या प्रकरणात जमानतीवर सुटला. त्यानंतर तो बराच काळ फरार होता. दरम्यान तो चंद्रपुरात दारूची तस्करी करीत होता. दोन महिन्यापुर्वी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी त्याला पकडले. तेंव्हापासून तो तुरुंगात आहे. चिंतलवार गँगविरुद्ध मकोकाची कारवाई केल्यामुळे दक्षिण नागपुरातील गुन्हेगारात खळबळ उडाली आहे. सुमितच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्यामुळे पोलिसांनी त्यांची नावे उघड केलेली नाहीत. सुमितचे संपुर्ण कुटुंबच गुन्हेगारीत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तहसिल पोलीस ठाण्याच्या परिसरात सक्रिय कुख्यात गुन्हेगार दानिश अहमद मुश्ताक अहमदला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. दानिशच्या विरुद्ध दंगा, मारहाण, हल्ला, हप्ता वसुलीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो जाफरनगरात राहतो. तो तहसिल पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीच्या घटना घडवितो. त्याला अटक करून भंडारा येथे नातेवाईकांच्या घरी सोडण्यात आले आहे. यशोधरानगर ठाण्याच्या परिसरातील गुन्हेगार अब्दुल बाशीद ऊर्फ बाशीद पटेलला तीन महिने तसेच अब्दुल अलीम अब्दुल अजीजला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. बाशीदला खापरखेडा आणि अलीमला खापा येथे नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे.ठाण्यातून सोडले आरोपीलादानिशच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भावाने याच आठवड्यात मोमिनपुरा चौकात हंगामा करताना रोखल्यामुळे पोलिसांशी वाद घातला होता. त्याला तहसिल ठाण्यात आणल्यानंतर ठाण्यातच त्याला जमानत देण्यात आली. त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करता आली असती. तो काही दिवसांपूर्वीच एमपीडीए अंतर्गत एका प्रकरणातून सुटला होता. या प्रकरणाची माहिती झाल्यानंतर झोन तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी पोलिसांना फटकारले होते. त्यानंतर दानिशचा भाऊ भूमिगत झाला आहे.
माया गँगवर लावला मकोका : सुमित चिंतलवार सूत्रधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:45 IST
माया गँगचा सूत्रधार सुमित चिंतलवार आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध नंदनवन पोलिसांनी मकोका लावला असून तहसिल पोलिसांनी कुख्यात दानिश अहमदसह तीन गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे.
माया गँगवर लावला मकोका : सुमित चिंतलवार सूत्रधार
ठळक मुद्देकुख्यात दानिशसह तिघे तडीपार